Ambadas Danve News : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या...

Maratha Reservation : आरक्षणासाठी कायगांव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यापासून लाॅंग मार्च काढण्यात आला.
Opposition Leader Ambadas Danve News,Mumbai
Opposition Leader Ambadas Danve News,MumbaiSarkarnama

Budget Session : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बुधवारी एक रॅली मुंबईत पोहचली आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल या आशेने व आस्थेने मराठा समाजातील तरुण मुलं डोळे लावून बसली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.

Opposition Leader Ambadas Danve News,Mumbai
Uddhav Thackeray News : पक्षाचे नाव, चिन्ह गेले तरी ठाकरे गटाकडे ओढा, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन..

आज सभागृहात २८९ अनव्ये प्रस्ताव सादर करत त्यांनी सभागृहाचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. (Budget Session) मराठा आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संविधानात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला.

मात्र आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे सत्ताधारी सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगांव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यापासून लाॅंग मार्च काढण्यात आला होता.

शकडो वाहने घेवून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते वाहनाने मुंबईत दाखल झाले. मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देवून समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com