Ambadas Danve News : बनावट इंजेक्शन, गोळ्यांची विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा ..

Mumbai : ज्यांच्याकडून या इंजेक्शनची विक्री केली जाते असे १२ विक्रेते आम्ही शोधले. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Minister Sanjay Rathod-Ambadas Danve News
Minister Sanjay Rathod-Ambadas Danve NewsSarkarnama

Vidhan Parishad : मुंबईत बनावट गोळ्या आणि इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी विवेक कांबळी यांचा अशाच बनावट इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाला आहे. सैफी सारख्या नामांकित हाॅस्पीटलमध्ये हा प्रकार घडला आहे. या मागे मोठी चेन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात केली.

Minister Sanjay Rathod-Ambadas Danve News
Sandipan Bhumre News : मोर्चात सहभागी न झालेला ठाकरे गट म्हणजे एमआयएमची पिलावळं..

दानवे म्हणाले, ज्या सैफी हाॅस्पीटलमधून कांबळी यांनी इंजेक्शन खरेदी केले होते. ते हाॅस्पीटल प्रतिथयश आहे, परदेशातून अनेकजण उपाचारासाठी इथे येत असतात. (Mumbai) मग असा प्रकार कसा घडला. तपासणीत साठा मिळाला परंतु या मेडिकलला औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने पुरवठा केल्याच्या नोंदी नाही. (Sanjay Rathod) म्हणजे बेकायदा इंजेक्शनची खरेदी येथे केली गेली. ४५०० बनावट इंजेक्शन विकली गेली आहेत. कांबळी यांच्या सारख्या अनेक घटना घडल्या असतील, पण तक्रार झाल्या नसतील.

आॅनलाईन औषध खरेदीचे प्रकार देखील वाढले आहेत,यात परवानगी नसलेली औषध देखील मागवली जातात, या बाबत सरकार काय खबरदारी घेत आहे. पोलिस, अन्न औषध विभागाच्या कारवाईच्या भितीने गावाच्या अलीकडेच औषधी उतरवून घेतली जातात. अशा मेडिकल, हाॅस्पीटलवर आणि जबाबदार लोकांवर काय कारवाई केली, असा प्रश्न २८९ अन्वये दानवे यांनी अन्न व औषध विभागाचे मंत्री आणि सभागृहाला विचारला.

यावर मंत्री संजय राठोड यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, हे खर आहे विवेक वामन कांबळी या कक्ष अधिकाऱ्याचा सैफी रुग्णालयात मृत्यू झाला. तांबड्या पेशी वाढवण्यासाठी त्यांना ओरोफेअर एफसीएम हे इंजेक्शन देण्यात आले होते. हे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुषमा कांबळे आपल्या मंत्रालयात अवर सचिव आहेत, त्यांनी ईमेलद्वारे आमच्याकडे तक्रार केली, स्वतःही भेटल्या. त्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली तेव्हा हाॅस्पीटलच्या मेडिकलमधून सात इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले होते.

प्रयोगशाळेतील तपासणीत ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ज्या कंपनीचे हे इंजेक्शन आहे, तिथेही तपासणी केली, तेव्हा ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ज्यांच्याकडून या इंजेक्शनची विक्री केली जाते असे १२ विक्रेते आम्ही शोधले. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीपर्यंत ही चैन आहे, दिल्लीतील काही लोकांना आरोपी केले असून तिघांना अटक केली आहे. १२ विक्रेत्यांपैकी ४ जणांचे परवाने रद्द केले असून इतरांवर देखील कारवाई सुरू आहे.

Minister Sanjay Rathod-Ambadas Danve News
Mla Dhiraj Deshmukh News : आधीचीच मदत मिळाली नाही, त्यात शेतकऱ्यांपुढे नवे संकट..

अन्न व औषध विभागाकडून १ लाख १८ हजार परवान्यांची तपासणी सातत्याने केली जाते. यात ८९ हजार किरकोळ विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या. ९९६ उत्पादकांच्याही तपासण्या केल्या आहेत. पोलिस तपासाचा अहवाल आला की दोषींवर पुढील कारवाई केली जाईल, असे राठोड यांनी स्पष्ट केले. यावर आमदार वंजारी यांनी नागपूरच्या अपोलो फार्मसीमधील प्रकार सांगितला. ते म्हणाले, अपोलो फार्मसीमधून मी मंत्र्यांच्या नावावाने गोळ्या आणल्या आहेत.

विना प्रिस्कीप्शन औषधी विक्री करणारा अपोलो फार्मसीवाला सरकारचा जावई आहे का? त्याच्यावर कारवाई होणार का? त्याला मोक्का लावणार का? यावर आजच तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन राठोड यांनी दिले. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, औषध बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. यापेक्षा आणखी कुठला पुरावा सरकारला कारवाईसाठी हवा आहे, असा प्रश्न गटनेते अनिल परब यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in