
Mumbai : एकीकडे शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सुलतानी संकटाचा सामना करत होता, त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmers) नुकसानीबाबत सभागृहाचे दानवे यांनी लक्ष वेधले. २८९ अनव्ये प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करून सरकारला यावर उत्तर देण्यास भाग पाडावे, अशी मागणीही दानवे यांनी केली. (Marathwada)
नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गाव शेतकऱ्याने विकायला काढले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, एकीकडे सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत असताना अस्मानी संकट आता मोठा घाव करत आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडला आहे.
शेतकरी छाती बडवून घेत असल्याची चित्रफीत पाहिली. नाफेडची खरेदी ही थंडावली असल्याने सरकारने या अस्मानी संकटावर चर्चा करावी. मदतीची केवळ पोकळ घोषणा न करता यावर चर्चा करावी.
मागच्या वेळेस पण चार चार वेळेस राज्यात अतिवृष्टी झाली मात्र शेतकऱ्यांना मदत वेळेवर पोहोचली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी २८९ अनव्ये चर्चा घ्यायला पाहिजे होती मात्र ती घेण्यात आली नाही. सरकार यावर काय मदत करणार आहे याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणीही दानवे यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.