Ambadas Danve News : राऊतांचे समर्थन नाही, पण विरोधी पक्षाने कोणता देशद्रोह केला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे..

Vidhan Parisad : चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाला संविधानिक अधिकार आहे.
Ambadas Danve-Eknath Shinde News, Mumbai
Ambadas Danve-Eknath Shinde News, MumbaiSarkarnama

Budget Session : राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरातील शिवगर्जना मेळाव्यात बोलतांना महाराष्ट्राचे विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ आहे, तिथे सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान केले. (Ambadas Danve) यावरून विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाने राऊत यांच्यावर हक्कभंग आणत अटकेची कारवाई करण्याची मागणी करत गदारोळ केला. याला महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

Ambadas Danve-Eknath Shinde News, Mumbai
Vidhan Parishad News : संजय राऊतांच्या विधानाविरुद्ध हक्कभंगाचा निर्णय उद्या , आजचे कामकाज तहकूब..

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या चहापान बहिष्कारावरून त्यांना देशद्रोही संबोधले होते. हा मुद्दा उपस्थीत करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. (Sanjay Raut) राऊतांच्या विरोधात हक्कभंग आणणार असला तर मग मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही म्हटले त्याची देखील चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावरही चौकशी करा, असा पावित्रा घेतला.

यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचे का? असा सवाल केला. त्यानंतर विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तत्पुर्वी दानवे म्हणाले, चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाला संविधानिक अधिकार आहे.

अस असतांना जेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करतांना संपुर्ण विरोधी पक्षाचा उल्लेख देशद्रोही म्हणून केला. अशा प्रकारे जर मुख्यमंत्री सर्व विरोधी पक्षाला उघड उघड देशद्रोही म्हणत असतील तर त्याची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com