Ambadas Danve News : औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार..

Shivsena : रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केलं जातंय याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News.
Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News.Sarkarnama

Mumbai : छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेषबाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.

Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News.
Shivsena News : बाळासाहेबांनी संभाजीनगरची घोषणा करताच `औरंगाबाद`ला काळे फासणाऱ्या महिला शिवसैनिकांचा सत्कार..

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली. (Aimim) तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केलं जातंय याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. (Shivsena)

यावर सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.

तसेच औरंगजेबाच समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याच्या नामांतराच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.

त्यानंतर शहरात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी काही तरुणांनी आंदोलनस्थली औरंगजेबाचे पोस्टर झळकवत घोषणाबाजी केली होती. या शिवाय एका चौकाला आलमगीर औरंगजेब असे नाव देण्याचा देखील प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com