Ambadas Danve News: तीस-तीस घोटाळ्यात दानवेंचे नाव ; पण ते म्हणतात, तो मी नव्हे..

Aurangabad News: संतोष राठोड आणि त्याच्या साथीदारांनी अनेकांना फसवूण कोट्यावधी रुपयांचा घोळ केल्याचे उघडकीस आले होते.
Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve news, AurangabadSarkarnama

Marathwada Political News: जिल्ह्यात गाजलेला आणि बड्या-बड्या लोकांची नावे असलेल्या तीस-तीस घोटाळ्यात आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव समोर आले आहे. या घोटाळ्याची (Scam) चौकशी करत असलेल्या पोलिस पथकाच्या हाती लागलेल्या डायरीत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या आमदार, त्यांचे नातेवाईक, पोलिस अधिकारी, शिक्षक, उद्योजकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत.

Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Sanjay Raut News : दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचं खुलं आव्हान ; 'तुमच्या नाकाखालून..'

यामध्ये अंबादास दानवे यांचे नाव देखील असल्याचे समजते. या घोटाळ्यातील मुख्य आरोप संतोष राठोडकडून हस्तगत केलेल्या डायरीतून बरीच नाव उघड झाली आहेत. (Aurangabad) दरम्यान, `सरकारनामा`शी बोलतांना अंबादास दानवे यांनी मात्र `तो मी नव्हे` म्हणत तो दानवे इतर कुणी असले, हा घोटाळा काय आहे? यात माझं नाव कुठून आलं, या संदर्भात मला काहीच माहित नाही, असे म्हटले आहे. (Marathwada) तीस-तीस घोटाळ्यामध्ये अनेक लोकांचे कोट्यावधी रुपये बुडाले आहेत.

संतोष राठोड आणि त्याच्या साथीदारांनी अनेकांना फसवूण कोट्यावधी रुपयांचा घोळ केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असतांना आरोपी राठोडकडून मिळालेल्या डायरीत अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत. या प्रकरणाची ईडीकडून देखील चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

३०-३० योजनेच्या नावाखाली भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना गुंतवणुकीवर ३० टक्के परतावा देतो, असे अमिष दाखवण्यात आले होते. सुरुवातीला काही शेतकऱ्यांना परतावाही मिळाला. त्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढत गेल्यानंतर संतोष राठोड आणि त्याच्या एजंटांनी अचानक हात वर केले.

हजारो शेतकऱ्यांनी या स्कीममध्ये पैसे गुंतवले असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील या योजनेत पैसे गुंतवूण फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com