Ambadas Danve : पालकमंत्र्यांच्या मतदारसंघाला अर्थसंकल्पात ठेंगा, दानवे म्हणाले, तुम्ही पैठणचे नाथ सोडले अन् ..

Sandipan Bhumre : तालुक्याला अर्थसंकल्पात काहीच न मिळाल्याने विकासकामे, प्रकल्प कागदावरच राहणार की काय?
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre NewsSarkarnma

Shivsena : नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील प्रकल्पांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. खुद्द पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघाला निधी मिळाला नाही, तिथे डीपीडीसीला वाढीव निधी आणतो हा भुमरेंचा (Sandipan Bhumre) दावा देखील फोल ठरला आहे.

Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Chhatrapati Sambhajinagar: कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील भीषण वास्तव; आठवड्याभरात तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

१३८ कोटी वाढीव निधी जिल्हा नियोजन समितीला मिळणार असे भुमरे सांगत होते. प्रत्यक्षात फक्त ६८ कोटी रुपयेच वाढवून मिळाले. (Shivsena) यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांना डिवचले आहे. (Guardian Minister) दानवे यांनी ट्विट करत भुमरेंना तुम्ही पैठणचे नाथ सोडून भलत्याच नाथाच्या नादी लागलात, असा टोला लगावला आहे.

दानवे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भुमरे जी, सगळेच उद्धव ठाकरे साहेबांसारखे मुख्यमंत्री नसतात. वॉटरग्रीड, संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा सुरू करण्याची तयारी मविआ सरकारने चालवली होती. पण तुम्ही पैठणचे नाथ सोडले, आणि भलतेच नाथ पकडले. घ्या आता ठेंगा! अशा शब्दात दानवे यांनी भुमरेंवर टीका केली आहे.

त्यामुळे पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे पैठण तालुक्याचा सर्वांगीण विकाल होईल ही अपेक्षा फोल ठरली असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. तालुक्याला अर्थसंकल्पात काहीच न मिळाल्याने विकासकामे, प्रकल्प कागदावरच राहणार की काय? असे प्रश्न उपस्थीत केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com