हिंमत असेल तर…समोर या; दानवेंचा गायकवाडांना इशारा

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शिवसैनिकांना इशाार दिला होता
Sanjay Gaikwad, Ambadas Danve
Sanjay Gaikwad, Ambadas Danvesarkarnama

औरंगाबाद : बुलढाण्यात शनिवारी शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी वादग्रस्त विधान केले होते. पुन्हा राडा केल्यास 'चून चून के मारे जाएंगे' असा इशारा गायकवाड यांनी शिवसैनिकांना दिला होता. या इशाऱ्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दानवे म्हणाले, शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे. हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर या, असे जाहिर आव्हान त्यांनी गायकवाड यांना दिले आहे. गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चून चून के मारेल व कोण गिन गिन के मारेल, असे दानवे म्हणाले.

Sanjay Gaikwad, Ambadas Danve
मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची नैसर्गिक जबाबदारी कॉंग्रेसची !

शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते गायकवाड यांच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करत आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ घातल होते. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले.

Sanjay Gaikwad, Ambadas Danve
तेजस ठाकरेंची राजकारणात होणार ग्रॅण्ड एन्ट्री; पेडणेकरांचे सूचक विधान

या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. पुन्हा राडा केल्यास 'चून चून के मारे जाएंगे' असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी शिवसैनिकांना दिला होता. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी अशीच भाषा वापरणार, असेही गायकवाड यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com