Ambadas Danve : बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्या जिल्ह्यात पाय रोवण्याचे स्वप्न भाजपने पाहू नये..

Shivsena : वैजापूर तालुक्यातील शिवसेना गद्दाराच्या मागे नसून निष्ठावंतांच्या पाठीशी
Ambadas Danve Rally In Vaijapur News
Ambadas Danve Rally In Vaijapur NewsSarkarnama

Shivsena News : विश्वासघाताचे राजकारण करुन सत्ता भोगणाऱ्या गद्दारांचे राजकीय अस्तित्व येणाऱ्या निवडणुकीत शिल्लक राहणार नसल्याचा दावा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी वैजापूर येथे बोलताना केला. दिवंगत माजी आमदार आर.एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

Ambadas Danve Rally In Vaijapur News
Aimim : आमच्यासोबत असते तर प्रकाश आंबेडकर किंगमेकर ठरले असते..

यावेळी डोंगरथडी, गंगथडी, शिवनाथडी या परिसरातील चिकटगावकर समर्थकांनी (Shivsena) शिवसेनेत प्रवेश केला. दानवे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ते मंत्र्याचे भष्ट्राचार, भाजपाच्या नेत्यांकडून अनेक वेळा महापुरुषाचा होणारा अवमान या प्रकारावर सत्ताधा-यांचे वाभाडे काढण्याचे काम विरोधी पक्ष सातत्याने करत असल्यामुळे शिंदे -भाजप सरकार जनतेच्या मनात भष्ट्र ठरत आहे. (Aurangabad)

वैजापूर विधानसभा मतदारसंघात दिवंगत लोकनेते आर. एम. वाणी यांनी शिवसेना पक्ष संघटनेची चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आहे. त्यात नव्याने माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांची शक्ती सोबत आल्यामुळे या मतदार संघात येत्या निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडून येईल.औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड शिवसेनेकडून केली जाईल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पाठबळ देणा-या या मतदार संघात पाय रोवण्याचे स्वप्न भाजपने पाहू नये. वाणी यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांनी शहरातून भव्य मिरवणूक काढत वैजापूर तालुक्यातील शिवसेना गद्दाराच्या मागे नसून निष्ठावंतांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. शिंदेसेनेत नेते गेले मात्र कार्यकर्ते शिवसेनेत कायम आहेत हे लक्षात ठेवा, असा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in