लक्ष्मीदर्शनाची तयारी : नगरपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचे वाटप; सात जणांवर गुन्हा

पोलिसांनी या धाडीत २५ हजार रुपये रोख व मतदार यादी जप्त केली. (parbhani District)
Nagar panchayat Election

Nagar panchayat Election

Sarkarnama

परभणी ः नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांकडून मतदांनारा लक्ष्मीदर्शन घडवले जात आहे. (Parbhani) पालममध्ये असा प्रकार उघडकीस आला आहे. (Marathwada) मतदानाच्या पुर्वसंध्येला मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालम नगरपंचायत निवडणूकीत पैसे वाटपाचा प्रकार समोर आला असून निवडणूक आयोगाकडून ७ जणांविरूद्ध पालम पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाग क्रमांक १४ मध्ये हाके गल्लीत मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाली होती.

यावरून बळीराम हाके यांच्या घरी छापा टाकण्यात आला. तिथे मतदार यादीसह पैसे वाटप होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस दाखल होताच आरोपींपैकी दोघांनी धक्काबुकी करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या धाडीत २५ हजार रुपये रोख व मतदार यादी जप्त केली.

<div class="paragraphs"><p>Nagar panchayat Election</p></div>
लग्न कधी करायचे, मुल जन्माला कधी घालायची हे मोदींनी ठरवू नये..

दरम्यान, या घटनेने पालम शहरात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर पालम नगरपंचायत निवडणुकीत लक्ष्मी अस्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पैसे वाटप करणारे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील एकमेव पालम नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे. एकूण १७ जागा असून ओबीसीच्या चार जागा रिक्त असल्याने प्रत्यक्ष १३ जागांसाठीच मतदान होणार आहे. यासाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com