Aurangabad : आघाडी सरकार गेले, शिंदे-फडणवीसांचे आले ; तरी पाणी योजना पुढे सरकेना...

Aurangabad : कराड, सावे यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation NewsSarkarnama

Water Issue News : राज्यात युतीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Aurangabad औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना जाहीर केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे या योजनेला फारशी गती मिळाली नाही.

Aurangabad Municipal Corporation News
Bhagwat Karad News : 'विदर्भ व मराठवाड्यासाठी समृद्धी महामार्ग फडणवीसांची देणगी!'

कोरोनाने राज्याचे आर्थिक चक्र थांबले त्याचा परिणाम या योजनेवर झाला. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे अडीच वर्ष संपले आणि पुन्हा सत्तातंर होऊन शिंदे-फडणवीसाचे सरकार आले, मात्र १७ लाख (Aurangabad) औरंगाबादकरांच्या पाण्याचा प्रश्न मात्र जैसे थे च आहे. १६८० कोटींची योजना आता २७०० कोटींवर पोहचली आहे, पण कामाला मात्र काही केल्या गती मिळत नाहीये.

येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. तेव्हा महापालिकेवर गेली २५ वर्ष सत्ता उपभोगलेल्या शिवसेना-भाजपसाठी शहरातील पाणी प्रश्न अडचणीचा ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात या योजनेला गती देण्याचा प्रयत्न झाला, पण संबंधित कंत्राटदाराने योजना परवडत नसल्याचे कारण देत काम रखडवले होते.

४०० कोटी अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवल्यानंतर काम सुरू झाले, पण ते उद्दिष्टापेक्षा निम्मेच असल्याने पाणी योजना पुर्ण होण्यासाठी आणखी किमान दोन वर्ष वाट पहावी लागणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी नुकताच या योजनेचा आढावा घेतला आणि संताप व्यक्त केला.

या सरकारच्या काळात औरंगाबादची पाणीपुरवठा योजना पुर्ण झाली तर त्याचा लाभ भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थासह २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील होऊ शकतो. परंतु कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे या योजनेला गती मिळत नाहीये.

Aurangabad Municipal Corporation News
Raj Thackeray : "चित्रपट थोडा रंजक दाखवावाच लागतो, इतिहास भयंकर रूक्ष असतो!"

गेल्याच आठवड्यात शहरातील पंतप्रधान अवास योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मंत्री डाॅ. कराड, सहकारमंत्री अतुल सावे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. फडणवीसांनी देखील या कामाला गती देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आणायची असेल तर पाणीप्रश्न आणि पंतप्रधान अवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळवून देणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कराड, सावे यांनी या रखडलेल्या योजनांना गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळते? यावरच महापालिकेतील यश अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com