Shivsena : मुंबईनंतर ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेकडे सगळ्यांचे लक्ष ; उद्या वर्षावर घेणार आढावा..

उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनच्या सभेकडे उत्तर सभा म्हणून पाहिले जात आहे. ही सभा मुंबईपेक्षा मोठी आणि आतापर्यंतच्या गर्दीचे सगळे रेकाॅर्ड मोडणारी ठरावी यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. (Shivsena)
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मुंबईच्या बीकेसी मैदानावर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १४ मे रोजी जाहीर सभा झाली. (Shivsena) ही सभा रेकाॅर्डब्रेक झाल्याचा दावा शिवसेनेकडून केला गेला. शंभर सभेची बाप असेही म्हटले गेले. यावर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषी महासंकल्प सभा घेत शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. या दोन जाहीर सभांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतांनाच आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ८ जून रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेकडे.

ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड जाहीर सभा घेऊन भोंग्याचा मुद्दा उपस्थिती केला, त्याच मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. (Aurangabad) राज ठाकरे यांच्या पेक्षाही जास्त गर्दी या सभेला जमवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

त्यासाठी उद्या, वर्षा बंगल्यावर या सभेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते व मराठवाड्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली असल्याची माहिती आहे. ८ जून हा शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखा स्थापनेचा दिवस आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृकित मंडळावर होणार आहे.

ठाकरे यांच्या या मैदानावर यापुर्वीी देखील अनेक सभा झालेल्या आहेत. परंतु यावेळची सभा जरा खास असणार आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा याच मैदानावर १ मे महाराष्ट्रदिनी झाली होती. या सभेत राज यांनी केलेले भाषण वादळी आणि वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता.

Cm Uddhav Thackeray
Jalna : ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात, `संभाजीनगर`चा विषय अजेंड्यावरच नाही..

उद्धव ठाकरे यांच्या ८ जून रोजी होणाऱ्या सभेकडे उत्तर सभा म्हणून पाहिले जात आहे. ही सभा मुंबईपेक्षा मोठी आणि आतापर्यंतच्या गर्दीचे सगळे रेकाॅर्ड मोडणारी ठरावी यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. या सभेचा आढावा उद्या उद्धव ठाकरे हे स्वतः घेणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सर्व नेते व मराठवाड्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना वर्षावर बोलावण्यात आले आहे.

मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मी बाबरी पाडायला गेलो होतो, या दाव्याची खिल्ली उडवली होती. तर हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुन्नाभाई म्हणत टोला लगावला होता. आता औरंगाबादेत उद्धव ठाकरेची तोफ कोणावर धडाडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com