औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा, जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १०३ कोरोना रुग्ण

औरंगाबाद महापालिका हद्दीत ८७ तर ग्रामीण भागात १६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona)
औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा, जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १०३ कोरोना रुग्ण

Corona Spread In Aurangabad

Sarkarnama

औरंगाबाद ः देशात, राज्यात कोरोना, ओमीक्राॅन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांनाच आज औरंगाबादेत (Aurangabad) एकाच दिवशी शंभरहून अधिक कोरोनाबाधित (Corona)आढळले आहेत. (Marathwada) लसीकरण, मास्क वापराबद्दल वेळोवेळी सूचना करून देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा असून वेळीच सावध न झाल्यास संसर्गाचा स्फोट होऊ शकतो.

मुंबई, पुणे या मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईत १ ते ९ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय कोरोना संसर्गाचे प्रमाण नागरिकांमधील बेफिकरी अशीच वाढत गेली, तर मात्र राज्य सरकार लाॅकडाऊन सारख्या कठोर पर्यायाचा विचार करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबादकरांसाठी धोक्याचा इशारा देणारी आकडेवारी समोर आली आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात मिळून आज एकाच दिवशी १०३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद महापालिका हद्दीत ८७ तर ग्रामीण भागात १६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

तिसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. रुग्ण संख्येत अशीच वाढ होत गेली तर शहर पुन्हा लाॅकडाऊनच्या उबरंठ्यावर जाऊ शकते. सध्या शहरात एकूण १७४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

<div class="paragraphs"><p>Corona Spread In Aurangabad</p></div>
केंद्राच्या नव्या अटीने ना मराठा आरक्षण, ना ईडब्ल्यूएसचा उपयोग अशी अवस्था..

प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार शहरातील सिडको एन-१ ते एन-५, पडेगाव, मुजीब काॅलनी, एनआरएच वसतीगृह परिसर, चेतनानगर, टिळकनगर, बन्सीलालनगर, हर्सुल, वेदांतनगर, कांचनवाडी, देवळाई, दर्गारोड, बीडबायपास, बायजीपुरा, उत्तमनगर, शिवाजीनगर, टीव्ही सेंटर, सिल्क मिल काॅलनी, उस्मानपुरा, म्हाडा काॅलनी, अरिहंतनगर, न्यू बालाजीनगर, शांतीनाथ हौसिंग सोसायटी, सुतगिरणीचौक, मिल्ट्री हाॅस्पीटल व इतर भागात एकूण ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागातील औरंगाबाद, फुलंब्री, गंगापूर, कन्नड, वैजापूर व पैठण तालुक्यात १६ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.