
Beed News : जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलाही दिलासा दिला जात नाही. विमा, मदत, अनुदान आदी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबीत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा ताफा जात असताना काळे झेंडे दाखविले.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांसह प्रमुख मंत्री सभा घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत पदाधिकऱ्यांनी घोषणाबाजी केली. मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा सभास्थळाकडे जाताना रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे फडकविले. शहरातील मोंढा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा वर्षा जगदाळे, अतुल कुलकर्णी, अजय कदम, सचिन जाधव, संतोष अस्वले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आशा कुटे, उपाध्यक्षा कल्पना कवटेकर, आशा घुले आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बीडमध्ये सभा घेल्यानंतर त्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची आज (ता. २७) बीडमध्येच जाहीर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रॅली काढली होती. यावेळी त्याचा ताफा पुढे जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.