Ajit Pawar Poster News : पवारांच्या अध्यक्षपदावरून खळबळ अन् इकडे परळीत पुन्हा अजित पवारांचे बॅनर..

Parli : हे पोस्टर अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरू शकते. तेही धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात हा प्रकार घडला.
Ajit Pawar Poster News
Ajit Pawar Poster NewsSarkarnama

Beed News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे घोषणा नुकतीच केली. त्यानंतर राज्यात आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे, पवारांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी राज्यभरात पदाधिकाऱ्याचे राजीनामे सत्र सुरू आहेत.

Ajit Pawar Poster News
Bjp News : सहा महिन्यापुर्वी पक्षात, निवडणुकीत पडले, तरी चिटणीसपद ; निष्ठावंतामध्ये नाराजी..

अशा तापलेल्या वातावरणात धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्या परळी मतदारसंघात पक्षाच्या एका माजी नगरसेवकाने `भावी मुख्यमंत्री अजित पवार`, (Ajit Pawar) असा उल्लेख असलेले बॅनर लावले. या बॅनरची चर्चा सोशल मिडियावर सुरू होताच, नेत्यांकडून फोनाफोनी झाली आणि हे पोस्टर अचानक गायब झाले.

शहरातील तळ (नेहरु चौक) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने भावी मुख्यमंत्री अजित पवार, असा उल्लेख असलेले बॅनर लावले. (Parali) सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेले वादळ पाहता हे पोस्टर अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

तेही त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात हा प्रकार घडल्याने याची तातडीने दखल घेतली गेली. संबंधित माजी नगरसेवकाला निरोप आले आणि तासाभरातच हे भावी मुख्यमंत्री लिहलेले बॅनर काढण्यात आले. आता पोस्टर लावल्याच्या चर्चेपेक्षा ते हटवल्याची चर्चा जोरात होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जाबेरखान पठाण यांनी हे पोस्टर लावले होते. या बँनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यासह जाबेरखान पठाण यांचेही फोटो होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com