Ajit Pawar News : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, यांना मंत्रीमंडळ विस्तार करता येईना..

Ncp : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त टिपोजीराव असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
Ajit Pawar News, Hingoli
Ajit Pawar News, HingoliSarkarnama

Hingoli : विरोधकांवर टीका, टिप्पणी करण्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची एक वेगळीच शैली आहे. त्यांच्या भाषणातील टोलेबाजीचे अनेकजण चाहते आहेत. राज्यातील रखडेलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर अशीच त्यांनी केलेली टोलेबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. वसमत येथे शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

Ajit Pawar News, Hingoli
Ajit Pawar News : उद्धवसेनेनंतर आता राष्ट्रवादीकडूनही भुमरे-बोरनारेंच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन..

नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण यांना सात महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार काही करता आला नाही, असा चिमटा पवारांनी काढला. (Eknath Shinde) शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का ? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थितीत केला. (Ncp)

राज्यातील सत्तांतरानंतर सरकार स्थापन होवून सात महिने झाले तरी मंत्रीमंडळ विस्ताराला काही मुहूर्त लागेना. मंत्रीमंडळात स्थान मिळेल म्हणून आशेवर असलेल्या शिंदे व फडणवीस गटातील आमदारांना अजित पवार त्यांनी शिवून ठेवलेल्या कोट, ज्योतपुरीवरूनही टोले लगावल्याने त्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.

आता पुन्हा त्यांनी सरकारच्या रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर टोलेबाजी केली. या शिवाय राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही, याचा उल्लेख करत सरकारला सुनावले. अजित पवार म्हणाले, महिलांना मंत्रिमंडळ स्थान देऊन असं फक्त मुख्यमंत्री म्हणतात, पण कधी देणार?

सरकारला सत्ते येऊन सात महिने झाले, मात्र अजून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येत यांना मात्र साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त टिपोजीराव असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com