अजितदादांचे शेलारांना खुले आव्हान; 'होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी'

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाजप नेते आशिष शेलार यांना प्रत्युत्तर
Ajit Pawar, Ashish Shelar
Ajit Pawar, Ashish Shelarsarkarnama

Ajit Pawar : मुंबई : मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आघाडी सरकारने वेदांता कंपनीकडे १० टक्के टक्केवारी मागितल्याचा आरोप आशिष शेलार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. याला आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी चौकशी करण्याचे खुले आव्हान शेलारांना दिले आहे.

अजित पवार बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधळा. '' वेदांता कंपनीच्या माध्यमातून दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार होती, त्यामध्ये हे सरकार कमी पडले. दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता. आता कंपनी तिकडे गेली, तर सांगतात मागच्या सरकारने काय केले?

Ajit Pawar, Ashish Shelar
भाजपकडे १२० आमदार असूनही... मुंडेंनी फडणवीसांना डिवचले

आशिष शेलरा यांनी केलेल्या आरोपांवर पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, वेदांत प्रकल्प गुजरातला जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार आहे हे खोटे आहे. केंद्रात तुमचे सरकार आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. करा चौकशी, होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, असे आव्हान दिले. हे स्थगिती सरकार आहे, असा हल्लाहोल त्यांनी केला. यापूर्वी कुठल्याही सरकारमध्ये अशी कामांची स्थगिती दिली जात नव्हती, असेही ते म्हणाले. आरोप-प्रत्यारोप करून राज्याचा विकास होणार नाही, आम्हीही चुकीचे आरोप करणार नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar, Ashish Shelar
मुख्यमंत्र्यांचा सावंत, शहाजीबापूंना ‘कोल्ड शॉक’; माढा, सांगोल्याची जबाबदारी दिली आपल्या खास व्यक्तीकडे

आशिष शेलार यांनी काय आरोप केला?

वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे...जनतेसमोर सत्य यायलाच हवे! गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात

उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला!, असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com