
Hingoli News : अजित पवार आणि त्यांचे सहकारी जेव्हापासून भाजपसोबत सत्तेत सामील झाले, तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होण्याचा चर्चांना उधाण आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्चीही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर भाष्य करत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच शिंदे यांच्यावर हात वारे करून टीकाही केल्याने पुन्हा एकदा शिंदे- ठाकरे गटाचा संघर्षात ठिगणी पडणार असल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या सभेच्या पाहणीसाठी खासदार विनायक राऊत हिंगोलीत आले होते. यावेळी माध्यमांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार का, असा सवाल करताच विनायक राऊत यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच इकडे आलेत, त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची बळकवायला सुरुवात केली आहे. मंत्रालयातील वार रूमदेखील त्यांनी ताब्यात घेतली आहे, असे म्हणत उजव्या हाताचा ठेंगा दाखवला आहे
दरम्यान, उद्या मराठवाड्यात राजकीय सभांचा धुराळा उडणार आहे. बीड, हिंगोली आणि परभणी या तीन ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. हिंगोली शहरात रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मराठवाड्यातून मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आला आहे. 'तेच तेज,तेच सळसळतं रक्त,तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर', अशा शब्दांनी टीझरची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असं आवाहनही टीझरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.