Ajit Pawar : कोरोनामध्ये धंदे बसले, नोकऱ्या गेल्या आणि यांना भोंगा आठवतोय...

भोग्यांचा विषय आताच काढायची काय गरज होती ? सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अगदी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. (Ajit Pawar)
Ajit Pawar- Raj Thackeray
Ajit Pawar- Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : हनुमान चालीसा आणि भोग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापवणाऱ्या नेत्यांचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. कोरोनाच्या दोन वर्षात अनेकांचे धंदे बसले, नोकऱ्या गेल्या, कंपन्या बंद पडल्या. (Raj Thackeray) ते सगळं आपल्याला रुळावर आणायचं आहे. यांना मात्र हनुमान चालीसा आणि भोंगा आत्ताच आठवला आहे असा,टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यांना नाव न घेता लगावला.

भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आपण त्याचे पालन करून एकमेकांच्या सण उत्सवांमध्ये सहभागी होऊ, शाहू, फुले आंबेडकरांची हीच तर शिकवण आहे असेही अजित पवार म्हणाले. (Aurangabad) औरंगाबाद येथे आयोजित मुप्टाच्या अधिवेशनात अजित पवार बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरणाऱ्या आणि त्यातून वातावरण बिघडवण्याचा राणा दाम्पत्यावरही अजित पवारांनी टीका केली. अजित पवार म्हणाले, दोन वर्षाच्या कोरोनाने सर्वसामान्याचे जगणे अवघड केले. अनेकांचे धंदे, व्यवसाय बसले, तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, कंपन्या बंद पडल्या. या सगळ्या गोष्टी व्यवस्थीत करायचा प्रयत्न आपण करतो आहोत.

पण कुणाला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणायची आहे, तर कुणी भोग्यांचा मुद्दा उपस्थितीत करतोय. यांना आताच हे आठवले का? मला हनुमान चालीसा म्हणायची असेल तर मी माझ्या घरी किंवा जवळच्या मंदिरात जाऊन म्हणेन. पण यांना मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊनच म्हणायची. कशासाठी हा हट्ट? बर पोलिसांनी जाऊ नका, कायदा व सुव्यवस्था बिघडेल हे सांगितले होते, तरी गेले.

Ajit Pawar- Raj Thackeray
Ajit Pawar : विक्रम काळे मंत्री करा म्हणतो अन् इतक्या मागण्या करतो, की मी दबकतच आलो..

भोग्यांचा विषय आताच काढायची काय गरज होती ? सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अगदी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. वर्षातील कुठल्या पंधरा दिवसांत रात्री उशीरापर्यंत भोंगे वाजवायचे हे ठरवून दिलेले आहे. आपण त्याचे पालन करून एकमेकांच्या सण, उत्सवात सहभागी झाले पाहिजे. हीच तर आपल्या राज्याला शाहू, फुले, आंबेडकरांची शिकवण आहे, याची आठवण देखील अजित पवारांनी विरोधकांना करून दिली.

Ajit Pawar- Raj Thackeray
Aurangabad : जमावबंदी आदेश सभेमुळे काढलेला नाही ; वर्षभर असे आदेश असतात..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com