Jayant Patil : जळी, स्थळी, काष्ठी भाजपला राष्ट्रवादीच दिसते..

अजित पवार आणि माझ्यामध्ये मतभेद असल्याच्या वावड्या आहेत, त्यात तथ्य नाही, असे स्पष्टीकरण देखील पाटील यांनी दिले. (Jayant Patil)
Jayant Patil, NCP State President News Nanded
Jayant Patil, NCP State President News NandedSarkarnama

नांदेड : पत्राचाळ प्रकरणात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली. त्यानंतर शरद पवारांनी देखील भाजपला खुले आव्हान दिले. हा वाद वाढलेला असतांना (NCP) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील भातखळकर यांचा समाचार घेत भाजपवर निशाणा साधला.

भातखळकर आणि भाजपला जळी, स्थळी, काष्ठी राष्ट्रवादीच दिसते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. भातखळकर यांनी ताळतंत्र सोडले असल्याची टीका देखील त्यांनी केली. (Nanded) जयंत पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकारणीचा आढावा ते घेत आहेत.

नांदेड येथील बैठकी दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पाटील यांनी भाजपवर टीका केली. जयंत पाटील म्हणाले, भाजपचा राज्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरा कुणी शत्रू नाही. त्यामुळे भाजपला जळी, स्थळी आणि काष्ठी फक्त राष्ट्रवादीच दिसते. भातखळकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही.

अजित पवार आणि माझ्यामध्ये मतभेद असल्याच्या वावड्या आहेत, त्यात तथ्य नाही, असे स्पष्टीकरण देखील पाटील यांनी दिले. तत्पुर्वी पक्षाच्या बैठकीत पक्ष संघटनेत सभासद नोंदणी हा संघटना वाढीचा पाया आहे. जिल्ह्यातून प्राथमिक व क्रियाशील सदस्य नोंदणी अधिक कशी होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी केले.

Jayant Patil, NCP State President News Nanded
Khaire : आता फोटोला जोडे मारले, पुन्हा ठाकरे कुटुंबाबद्दल बोलाल तर प्रत्यक्षात मारू..

संघटनेत विविध पदांवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर विद्यार्थी व युवक काँग्रेसने विशेष परिश्रम घेतले पाहिजे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in