अजित दादांची राज्य सरकारवर टीका : म्हणाले, 'त्यांचा' पायगुण वाईट...

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज बीड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

बीड - राज्यातील शिंदे गट व भाजप सरकारला एक महिना पूर्ण झाला. मागील एका महिन्यापासून राज्यावर पूर, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड परिसरापासून आपत्तीग्रस भागांचा दौरा सुरू केला आहे. अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ( Ajit Dada's criticism of the state government: Said, 'their' footwork is bad... )

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरात चांगले झाले तर पायगुण चांगला म्हणतात. मात्र वाईट झाले तर पायगुण वाईट म्हणतात. असे आमच्या शेतकऱ्यांचे झाले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यात जे सरकार अस्तित्त्वात आले. त्यात दोघेच राज्याचे नेतृत्त्व करत आहेत. मराठवाडा व विदर्भाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मी, माजी मंत्री धनंजय मुंडे व सहकारी हे आपत्तीग्रस्त भागाचे दौरे करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
कोनशिला पाहून अजित दादांनी लावला कपाळाला हात

ते पुढे म्हणाले, आज मी ज्यावेळी बीड परिसरात आलो. त्यावेळी येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, गोगलगाईचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झालेला पाहिलेला नव्हता. हे संकट बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील सुमारे 700 हेक्टर जमिनीवर आहे. तोच प्रकार उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात आहे. गोगलगाईचा प्रादुर्भावही पीक आपत्तीत घ्या, असे सांगावे लागेल.

Ajit Pawar
शेतकऱ्यांच्या बांधावर जाताच अजित पवार म्हणाले, ``ते आमदारांचे सांगू नका...``

पीक विमा कंपन्यांना सांगावे लागेल की, राज्य सरकारने तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. ज्या-ज्या वेळी महाराष्ट्रातला शेतकरी नैसर्गिक आपत्तीत आलावर त्या-त्यावेळी संबंधित राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक असे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी एनडीआरएफ, केंद्राचा निधी येतो तेथे ही गोगलगाईच्या प्रदुर्भावाविषयी सांगितले पाहिजे. तर अधिकाऱ्यांनाही काम करणे सोपे होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in