AIMIM : घरातून हाकलून दिलेल्याबद्दल काय बोलणार ? योग्यवेळी उत्तर द्यायला आम्ही खंबीर..

कुणी कितीही भडकावण्याचा प्रयत्न केला तरी मुस्लिम समाजाने त्याला बळी पडू नये. आम्ही योग्य वेळी अशा लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहोत. (Aimim)
Raj Thackeray-Akbaruddin Owasi
Raj Thackeray-Akbaruddin OwasiSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे आक्रमक व भडकाऊ भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. (Aimim) आजच्या औरंगाबाद दौऱ्यात देखील ते काहीतरी बोलतील अशी अपेक्षा बाळगून शाळेच्या पायाभरणी कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीचा हिरमोड झाला. (Aurangabad) परंतु मशीदीवरील भोग्यांचा मुद्दा घेऊन औरंगाबादेत सभा घेतलेल्या राज ठाकरे यांना ओवोसी यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

` ज्यांना घरातून हाकलून दिले आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार ? तेवढी त्यांची लायकी देखील नाही. (MNS) मुस्लिम समाज कोणाच्याही भुलथांपाना बळी पडणार नाही, आम्ही कुणाला घाबरणारे नाहीत, योग्यवेळी त्याना उत्तर देण्यासाठी खंबीर आहोत, असा इशारा देखील अकबरुद्दीन ओवेसी यांनी यावेळी दिला. (Raj Thackeray)

ओवेसी स्कूल आॅफ एक्सलन्सीच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेची पायाभरणी करण्यासाठी अकबरुद्दान ओवेसी आज औरंगाबादेत आले होते. खुल्तबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन त्यांनी घेतल्याने वादाला तोंड फुटलेले असतांनाच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाना साधला.

ओवेसी स्कूल आॅफ एक्सलन्सीचे भुमीपूजन झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ओवेसी यांनी राज्यात आणि देशात मुस्लिम समाज शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात मागे असल्याचे सांगितले. हा देश जगात सुपर पावर ठरेल, त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रितपणे काम करावे लागेल. राज्यकर्त्यांनी एका समाजाला पुढे नेण्याचे काम करू नये, असेही ओवेसी म्हणाले.

Raj Thackeray-Akbaruddin Owasi
Shivsena : शाळा काढताय त्याबद्दल अभिनंदन ; पण औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेत राजकारण करू नका..

याचवेळी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारला अल्टीमेट देणाऱ्या राज ठाकरेंचाही अकबरुद्दीन यांनी अप्रत्यक्ष समाचार घेतला. मी महाराष्ट्रात कुणाला उत्तर द्यायला आलेलो नाही, तेवढी त्यांची लायकी देखील नाही. ज्यांना घरातून हाकलून दिले त्यांच्याबद्दल काय बोलायचे ?

कुणी कितीही भडकावण्याचा प्रयत्न केला तरी मुस्लिम समाजाने त्याला बळी पडू नये. आम्ही योग्य वेळी अशा लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहोत, असा इशाराही अकबरुद्दीन यांनी आपल्या भाषणात दिला. हा देश आमचा आहे, इथे सगळे सुखाने, गुण्यागोविंदाने राहू आणि देशाला पुढे नेऊ, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com