AIMIM : राज्यसभेत आणखी एक मुस्लिम खासदार वाढवा म्हणून आम्ही काॅंग्रेसला मत दिले..

पहाटे पाच वाजता या संदर्भात मी ट्विट केले होते, असदुद्दीन ओवेसी यांनी आदेश दिल्यानंतर तो निरोप आमच्या दोन्ही आमदारांना पोहचवण्यात आला होता. त्यानूसार आमची दोन्ही मतं ही काॅंग्रेसलाच दिली. (Mp Imtiaz Jalil)
Imtiaz Jalil News, Aurangabad Latest Marathi News,
Imtiaz Jalil News, Aurangabad Latest Marathi News, Sarkarnama

औरंगाबाद : राज्यसभा निवडणुकीत एमआयएमच्या दोन आमदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीने पाठिंब्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन केले होते. त्यानंतर ऐनवेळी एमआयएमने (Aimim) महाविकास आघाडीतील काॅंग्रेसला मतं देण्याचा निर्णय घेतला. काॅंग्रेसने मात्र एमआयएमची मदत घेतल्याचा इन्कार केला आहे, तर दुसरीकडे आमची दोन्ही मत काॅंग्रेसच्या इम्रान पतापगढींना दिल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला आहे. (Aurangabad Latest Marathi News)

राज्यसभेत आणखी एक मुस्लिम खासदार यावा म्हणून आम्ही इम्रान प्रतापगढीला मत दिले. तसेच आदेशच आम्ही आमच्या दोन्ही आमदारांना दिले होते. (Aurangabad) आता काॅंग्रेसची दोन मत कशी फुटली, कुणाला गेली याचा शोध त्यांनी घ्यावा, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. एमआयएमच्या दोन मतांसाठी शिवेसना औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्यांपुढे झुकली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

प्रत्यक्षात राज्यसभेसाठी मतदान होऊन मतदान झाल्यानंतर शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला, तर भाजपचा तिसरा उमेदवार अनपेक्षितपणे निवडून आला. महाविकास आघाडी या धक्यातून अद्याप सावरलेली नाही. त्याचे साईड इफेक्ट येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांसह शिवसेनेचे राष्ट्रवादी व काॅंग्रेसबद्दल देखील नाराजीचा सूर आळवला होता.

एमआयएमची दोन मत कुणाला मिळाली यावर देखील बराच खल झाला. भाजपने एमआयएमच्या दोन मतांचा वापर करत शिवसेनेचा गेम केला, असे देखील बोलले गेले. परंतु आम्ही महाविकास आघाडीला म्हणजे काॅंग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांनाच मतं दिल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Imtiaz Jalil News, Aurangabad Latest Marathi News,
Shivsena : रावसाहेब वीस वर्षापासून खासदार, लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते, मग त्यांनी काय केले ?

पहाटे पाच वाजता या संदर्भात मी ट्विट केले होते, असदुद्दीन ओवेसी यांनी आदेश दिल्यानंतर तो निरोप आमच्या दोन्ही आमदारांना पोहचवण्यात आला होता. त्यानूसार आमची दोन्ही मतं ही काॅंग्रेसलाच दिली गेली. पण काॅंग्रेसची दोन मंत फुटली, त्याचे खापर ते आमच्या माथी फोडत असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com