AIMIM : जीभ आम्हालाही आहे, आम्हीही बोलू शकतो...

मशिदीवरील भोंग्याचा विषय किंवा त्यावरून राज ठाकरे यांनी दिलेला इशारा हा मुस्लिम समाजाला नाही तर सरकार आणि पोलिस प्रशासनाला दिला आहे. (Mp Imtaiz Jalil)
AIMIM : जीभ आम्हालाही आहे, आम्हीही बोलू शकतो...
Mp Imtiaz Jalil, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जे व्हायचं ते एकदा होऊन जाऊ द्या, असा इशारा दिला आहे. (Aimim) तो इशारा काय आहे, हे मला प्रसार माध्यमांना कळंत. आता सरकार आणि पोलीस प्रशासनाला हे कळंत का हे पहावे लागेल. पण मी एवढंच सागू इच्छितो, की जीभ आम्हालाही आहे, आम्ही देखील बोलू शकतो, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेनंतर इम्तियाज यांनी त्यांच्या सभेतील विधानांचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिली. (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर चार तारखेनंतर ऐकणार नाही. (Marathwada) मशिदीसमोर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात वाजलाच पाहिजे.

सभे दरम्यान मशिदीतून भोंग्याचा आवाज सुरू झाला तेव्हा हे थांबवा नाहीतर यानंतर महाराष्ट्रात काय होईल हे मला माहित नाही. हे असंच करणार असतील तर एकदा काय व्हायंच ते होऊनच जाऊ द्या, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला होता.

त्यानंतर इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्ममांशी बोलतांना आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. इम्तियाज जलील म्हणाले, ज्या पद्धतीची भाषा राज ठाकरे यांनी भाषणातून केली आहे, तसं आम्ही बोललो असतो तर आतापर्यंत आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. कोरोनाकाळात माझ्यावर बारा गुन्हे दाखल आहेत. आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे मी पाहणार आहे.

Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Aurangabad : राज गर्जना झाली, पण शिवसेना, उद्धव ठाकरेंवर टीका न करता..

मशिदीवरील भोंग्याचा विषय किंवा त्यावरून राज ठाकरे यांनी दिलेला इशारा हा मुस्लिम समाजाला नाही तर सरकार आणि पोलिस प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे याचे काय करायचे ते पाहून घेतील आम्ही विरोध करणार नाही. मशिदीवरील भोंगे काढा असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नाहीत. आवाजा संदर्भातला तो आदेश आहे. या संदर्भात शासन जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.