AIMIM : इम्तियाज जलील यांच्या `इफ्तार` पार्टीला ओवेसींची हजेरी..

राजसभेला या पक्षाने कुठल्याही प्रकारचा विरोध न दर्शवता तटस्थ राहणे पसंत केले आहे. त्यामुळे एमआयएमच्या या भूमिकेचे सामान्याकडून कौतुक देखील होत आहे. (AIMIM)
Aimim Mp Assaduddin Owasi
Aimim Mp Assaduddin OwasiSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या निवास्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owasi) यांनी देखील हजेरी लावली. (Aimim) दुपारी त्यांनी मशिदीत जाऊन विशेष नमाजही अदा केल्याची माहिती आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी या इफ्तार पार्टीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आमंत्रित केले होते. यावरून मनसेने इम्तियाज (Imtiaz Jalil) यांना आमच्या दिवाळी्, गुडीपाडवा, होळी आणि गपतीच्या दर्शनाला या तुमचे स्वागत करू, असे म्हणत टीका केली होती. (Aurangabad)

राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. मशिदीवरील भोंग्याचा विषय घेऊन त्यांनी राज्यभरात रान पेटवलेले असतांना आता उद्या ते काय बोलणार? याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यासह मनसेचे सगळे नेते औंरगाबादेत दाखल झाले असतांना ओवेसी यांची देखील उपस्थिती शहरात असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे, येत्या बुधवारी किंवा गुरुवारी देशभरात हा सण साजरा केला जाणार आहे. तत्पुर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या निवासस्थानासमोर दावत ए इफ्तारचे आयोजन केले होते.

यासाठी बॅ. असदुद्दीन ओवेसी यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या उद्याच्या सभेमुळे राज्यातील वातावरण तापलेले असतांना ठाकरे आणि ओवेसी हे एकाच दिवशी शहरात उपस्थीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांना सभेला जाण्यापुर्वी माझ्या घरी इफ्तारला येऊन जा, असे आवाहन इम्तियाज यांनी केले होते.

Aimim Mp Assaduddin Owasi
Aurangabad : काय हा योगायोग ? राज ठाकरे थांबले त्याच हाॅटेलात राज्यपालही आले...

मशिदीवरील भोंग्यांच्या संवेदनशील विषयावर एमआयएमने घेतलेली भूमिका अनेकांना बुचकाळ्यात टाकणारी ठरली आहे. राजसभेला या पक्षाने कुठल्याही प्रकारचा विरोध न दर्शवता तटस्थ राहणे पसंत केले आहे. त्यामुळे एमआयएमच्या या भूमिकेचे सामान्याकडून कौतुक देखील होत आहे.

एकीकडे राज ठाकरे यांच्या सभेसाठी महाराष्ट्रच नाही तर थेट अयोध्येतून त्यांचे समर्थक उद्या औंरगाबादेत सभेसाठी येणार आहेत. तर दुसरीकडे एमआयएमने मात्र ओवेसींच्या उपस्थितीत इफ्तारचे आयोजन करत राजसभेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com