Aimim News : एमआयएमचा समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला विरोध..

Mumbai : वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि अतिक्रमण करणार्‍यांना बेदखल करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी कायद्यात सुधारणा
Aimim National Conference News,Mumbai
Aimim National Conference News,MumbaiSarkarnama

Mumbai : एमआयएमच्या पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा आज मुंबईत समारोप झाला. यावेळी अधिवेशनात अनेक ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोधाचा ठराव घेण्यात आला. एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी, (Asaduudin Owasi) खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले.

Aimim National Conference News,Mumbai
Smriti Irani News : स्मृती इराणी एक कोटी लाभार्थी महिलांसोबत घेणार सेल्फी..

आज समारोपाच्या दिवशी काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले. यात प्रामुख्याने इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी मुस्लिम आणि दलितांवर होणारे अत्याचार, हिंसाचाराचा निषेध, मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करणारा ठराव त्यांनी मांडला. (Aimim) माजी आमदार वारिस पठाण यांनी समान नागरी कायद्याला विरोध करणारा ठराव, तर सय्यद असीम वकार यांनी लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारा ठराव मांडला.

एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि अतिक्रमण करणार्‍यांना बेदखल करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप बंद करण्याचा आणि अल्पसंख्याक अनुसूचित जाती-जमातींच्या शिष्यवृत्तीवर निर्बंध घालण्याचा निषेध करणारा ठरावही त्यांनी यावेळी मांडला.

या शिवाय नागरी स्वातंत्र्याचे संरक्षण, सर्व राजकीय कैद्यांच्या सुटका आदी ठराव अधिवेशनात मांडण्यात आले. एमआयएम पक्ष राष्ट्रीय विस्तारासाठी आणि शोषितांच्या एकतेसाठी वचनबद्ध असल्याचा ठराव मांडतानाच चिनी घुसखोरीचा निषेधही यावेळी करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com