AIMIM March Against Police News : पोलिस अत्याचाराच्या विरोधात इम्तियाज जलील काढणार मोर्चा..

Police News : पिडित महिलेने इम्तियाज यांची भेट घेवून त्यांना झालेली मारहाण आणि गंभीर जखमा दाखवल्या होत्या.
AIMIM March Against Police News
AIMIM March Against Police News Sarkarnama

MP Imtiaz Jalil : कन्नड तालुक्यातील सेलगांव येथील एका महिलेस पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली कन्नडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. (Aimim March Against Police News) मंगळवारी (ता.६) हा मोर्चा काढण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एमआयएमच्या वतीने करण्यात आले आहे. शेलगाव गावात राहणाऱ्या ३८ वर्षीय शबाना पटेल या महिलेस पोलिस महिला अधिकारी व काही कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.

AIMIM March Against Police News
Minister Sanjay Rathod On Thackeray News : मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार होतो, पण महंतांच्या सल्ल्यामुळे शिंदेंसोबत गेलो...

या महिलेला वळ उमेटपर्यंत मारहाण करण्यात आली होती. (Imtiaz Jalil) इम्तियाज जलील यांना जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा त्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांनी संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. (AIMIM) या संदर्भात २ जून रोजी इम्तियाज जलील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, महिला आयोग यांना ट्विट करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

मात्र अद्याप या प्रकरणात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. दोन समुदायाच्या महिलांमध्ये झालेल्या भांडणांतून पिशोर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांनी शबाना पटेल यांना अमानुष मारहाण केल्याचा इम्तियाज यांनी आरोप केला आहे. (Police) पोलिसांच्या या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील मंगळवारी औरंगाबाद ते कन्नड असा मोर्चा काढणार आहेत.

पिडित महिलेने इम्तियाज यांची भेट घेवून त्यांना झालेली मारहाण आणि गंभीर जखमा दाखवल्या होत्या. त्यानंतर इम्तियाज यांनी संबंधित महिलेला पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्याकडे पाठवले होते. तेव्हा पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आश्वासन देखील दिले होते.

मात्र पुढे काहीच झाले नाही. पिशोर पोलिस स्टेशनच्या पीआय कोमल शिंदे आणि इतर चार पोलिस कर्मचार्‍यांनी या महिलेला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. सदर महिलेने पोलिसांची जीप अडवत दोन समुदायांमध्ये भांडण झाल्यानंतर दंगल घडविणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या रागातून शबाना पटेल या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

AIMIM March Against Police News
Mp Imtiaz Jalil On Ram Temple : एक मंदिर वाचवून मी हजारो मशिदी वाचवल्या...

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमा झालेल्या शबानाचे फोटो इम्तियाज यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांना पाठवले आहेत. या महिलेला थर्ड डिग्री टॉर्चर करण्याचे पोलिसांकडे कोणतेही कारण नसल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे. तसेच पुरुष पोलिसांकडून महिलेला मारहाण कशी करण्यात आली? याची देखील झाली पाहिजे, असेही इम्तियाज यांनी म्हटले आहे. संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com