`औरंगाबादचे माॅडेल `यूपी`त नेणार.. भाजपला हरविण्यासाठी कोणाशीही युती`

उत्तर प्रदेशातील प्रत्येक मुस्लिम व्यक्ती एमआयएमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, योग्य उमेदवार दिल्यास आम्ही तुम्हालाच मतदान करू, असे तेथील लोक आता बोलू लागले आहेत. (Mp Imtiaz Jalil)
Yogi Adityanath-Mp Imtiaz Jaleel
Yogi Adityanath-Mp Imtiaz JaleelSarkarnama

औरंगाबाद : स्वातंत्र्यकाळापासून ते आतापर्यंत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचा वापर करून घेतला. (Aimim) वोट बॅंक म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले, पण सत्तेत मात्र त्यांना कधी मानाचे स्थान दिले नाही. त्यामुळे आज सत्तर वर्षानंतरही देशातील मुस्लिमांची सर्वच क्षेत्रात दुरावस्था आहे. केवळ मुस्लिमच नाही तर प्रत्येक जातीतील दुर्लक्षित, गरीब घटकाला सत्तेत सहभागी करून घेणे हाच एमआयएमचा अजेंडा आहे, असा दावा खासदार इम्तियाज जलील (Imitaz Jalil) यांनी` सरकारनामा`शी बोलताना केला.

हा अजेंडा घेऊनच आम्ही बिहारमध्ये लढलो होतो, आता उत्तर प्रदेशात देखील आमचे तेच ध्येय असेल. कुठल्याही परिस्थितीत भाजपला (Bjp) रोखायचा आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीपणाला लावू, कोणत्याही पक्षासोबत जावू, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (Imitaz Jalil) यांनी `सरकारनामा`,शी बोलतांना सांगितले.

उत्तर प्रदेशातील प्रत्येक मुस्लिम व्यक्ती एमआयएमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, योग्य उमेदवार दिल्यास आम्ही तुम्हालाच मतदान करू, असे तेथील लोक आता बोलू लागले आहेत, असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला. उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आता सर्वच पक्षाच्या हालचालींना वेग ला आहे. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत एमआयएमने सहा आमदार निवडून आणत अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. आता या पक्षाने आपला मोर्चा उत्तर प्रदेशकडे वळवला आहे. गेल्या वर्षभरापासून खासदार असदोद्दीन ओवेसी युपीमध्ये पक्षाच्या बांधणीवर काम करत आहेत.

या राज्यात आपल्या पक्षाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने इथे निश्चित चांगले यश मिळेल असा, दावा देखील केला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील म्हणाले, निवडूणका जाहीर झाल्या आहेत, आमच्यासाठी उत्तर प्रदेशची निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण गेल्या वर्षभरापासून आमचे नेते ओवेसी यांनी इथल्या मुस्लिम व इतर गोर-गरीब समाजामध्ये एक विश्वास निर्माण केला आहे.

योग्य उमेदवार द्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास लोक आम्हाला देत आहेत. त्यामुळे आमचा उत्साह देखील वाढला असून महाराष्ट्रातील सगळे एमआयएमचे कार्यकर्ते आम्ही युपीमध्ये प्रचाराला नेणार आहोत. बिहार विधानसभा निवडणुकीचा अनुभव आणि त्यावेळी वापरलेली प्रचार यंत्रणाच आम्ही उत्तर प्रदेशात वापरणार आहोत.

Yogi Adityanath-Mp Imtiaz Jaleel
बिगुल वाजला! उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हेच माॅडेल आम्ही युपीमध्ये नेणार आहोत. ताकद असलेल्या मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित करून तिथे विजय मिळवायचाच असा आमचा प्रयत्न असणार आहे. असदुद्दीन ओेवेसी व माझ्यासह पक्षाचे इतर नेते देखील या निवडणुकीत प्रचार करणार आहेत.

कुणाशीही युती करू..

भाजपला सत्तेपासून रोखणे हे आमचे मुख्य लक्ष्य असणार आहे. निवडणुका जाहीर होण्यापुर्वी आम्ही शंभर जागा लढवण्याचे जाहीर केले होते. आता प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, त्यामुळे नव्याने बोलणी आणि आखणी करावी लागेल. भाजपच्या विरोधात जे जे कुठले पक्ष असतील त्या सगळ्यांशी आम्ही बोलणी करू.

उत्तर प्रदेशात फक्त मुस्लिमच नाही, तर कट्टर हिंदू नागरिक देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे भाजपकडून जे चित्र रंगवले जात आहे, की दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात यावेळी तुम्हाला वेगळे चित्र पहायला मिळेल, असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com