नाराजी सोडा, नवा पक्ष काढा ; इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सल्ला..

भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करता आम्हाला दलित आणि ओबीसी समाजासोबत जाणे हिताचे ठरेल, त्यामुळे आमचा पंकजा यांच्या नव्या पक्षाला निश्चित पाठिंबा असेल. (Mp Imtiaz Jalil)
नाराजी सोडा, नवा पक्ष काढा ; इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सल्ला..
Mp Imtiaz Jalil-Bjp Leader Pankaja MundeSarkarnama

औरंगाबाद : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव तुमच्या पाठीशी आहे, राज्याचे गृहमंत्री असतांना त्यांनी वंजारी समाजासाठी केलेले काम अजूनही समाज विसरलेला नाही. तेव्हा विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून लाचारी, नाराजी कशाला, सरळ नवीन पक्ष काढा, असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना पंकजा यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात आली होती, मात्र समितीकडून त्यांच्या नावावर फुली मारली गेली, असा दावा राज्यातील भाजप (Bjp) नेते करत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलले अशी भावना त्यांच्या समर्थकांची झाली असून ते रसत्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत.

या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना इम्तियाज जलील म्हणाले, ज्या दिवशी पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली, त्याच दिवशी त्यांनी भाजपला रामराम ठोकायला हवा होता. गोपीनाथ मुंडे यांचे नाव आणि त्यांनी वंजारी, ओबीसी समजासाठी केलेले काम आजही लोक विसरलेले नाहीत. मग अशावेळी उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा त्यांनी थेट नवा पक्ष काढावा. ओबीसी नेत्या म्हणून त्यांच्यामागे किती ताकद आहे हे महाराष्ट्राला नक्कीच दिसेल.

Mp Imtiaz Jalil-Bjp Leader Pankaja Munde
AIMIM : राज्यसभेत आणखी एक मुस्लिम खासदार वाढवा म्हणून आम्ही काॅंग्रेसला मत दिले..

पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःचा पक्ष काढला तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडेल, असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला. पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी आपण या संदर्भात एकदा दोनदा बोललो होतो, असेही ते म्हणाले. पंकजा यांनी स्वतःचा पक्ष काढला तर भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करता आम्हाला दलित आणि ओबीसी समाजासोबत जाणे हिताचे ठरेल, त्यामुळे आमचा पंकजा यांच्या नव्या पक्षाला निश्चित पाठिंबा असेल, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in