Aimim : राज्यसभेसाठी एमआयएमचे दोन आमदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?

ओवेसी आज नांदेडात येणार आहेत, तर उद्या त्यांची लातूरमध्ये सभा होणार आहे. या दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा होणार आहे. ( Mp Imtiaz Jalil)
Aimim : राज्यसभेसाठी एमआयएमचे दोन आमदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?
Aimim Chief Asaduudin OwasiSarkarnama

औरंगाबाद : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. भाजपने तिसरा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. (Aurangabad) भाजपकडून मतांची जुळवाजुळव झाली असून आमचा तिसरा उमेदवार निवडून येणारच असा दावा भाजपचे (Bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एक एक आमदार आपल्या बाजुने वळवण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने कंबर कसली आहे. आपापल्या आमदारांना मतदान होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येते आहे.

अशावेळी एमआयएमची (Aimim) भूमिका काय असणार आहे ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेसाठी एमआयएमकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) किंवा भाजप हे दोनच पर्याय असल्यामुळे या पक्षाचे दोन आमदार आपल्या मतांचे दान कोणाऱ्या पारड्यात टाकणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, एमआयएमचे खासदार तथा राज्याचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना भाष्य केले.

राज्यसभेसाठी कुणाला मदत करायची याचा सर्वस्वी निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी हेच घेणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीकडून आमदारांना निधी वाटप करतांना प्रचंड भेदभाव केला जातो. सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी पक्षाच्या आमदरांना कमी असा प्रकार गेल्या अडीच वर्षात पहायला मिळाला. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची नाराजी व्यक्त करणार आहोत.

या शिवाय आमच्या मागण्या देखील त्यांच्यासमोर ठेवणार आहोत. यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तर राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला मतदान करायचे का ? याचा विचार आम्ही करू, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. एमआयएमवर सातत्याने भाजपची बी टीम म्हणून उल्लेख केला जातो. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर देखील एमआयएम समाधानी नाहीत. अशावेळी राज्यसभेच्या निवडणुकीत ते कोणत्या पक्षाला मतदान करणार हे महत्वाचे ठरणार आहे.

Aimim Chief Asaduudin Owasi
Beed : कार्यालयात घुसून नायब तहसीलदारावर भावाकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला

शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी गोळाबेरीज करतांना एमआयएमच्या मतांचा देखील विचार करावा लागणार आहे. तर भाजपचा डोळा देखील त्यावर असणार आहे. अशावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एमआयएम पदाधिकाऱ्यांच्या कुटंबातील लग्न कार्यासाठी ओवेसी आज नांदेडात येणार आहेत, तर उद्या त्यांची लातूरमध्ये सभा होणार आहे. या दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in