Aimim : आ रहा हूं औरंगाबाद ; अकबरुद्दीन ओवेसी १२ मे रोजी शहरात..

ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची महाराष्ट्रातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन होत आहे. (Aimim)
Aimim Leader Akbaruddin Owasi
Aimim Leader Akbaruddin OwasiSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमचे वादग्रस्त नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी येत्या १२ मे रोजी औरंगाबादेत येत आहेत. (Aimim) यापुर्वीच ते औरंगाबादेत येणार होते, मात्र तेव्हा त्यांचा दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. (Aurangabad) आता १२ रोजी त्यांच्या हस्ते ` नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल`, संस्थेची पायाभरणी औरंगाबादेत केली जाणार आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी ही माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. आ रहा हूं औरंगाबाद, असे म्हणत इम्तियाज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे, एमआयएमचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि संस्थापक अध्यक्ष सालार-ए-मिल्लत एज्युकेशनल ट्रस्ट, हबीब-ए-मिल्लत जनाब अलहाज अकबरुद्दीन ओवेसी साहेब `नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल` च्या पायाभरणीसाठी औरंगाबाद येथे येणार आहेत.

कॅम्पस (ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची शाखा, औरंगाबाद) हिमायतबागच्या मागे १२ मे २०२२ रोजी दुपारी चार वाजता वंचित मुलांसाठी उभारण्यात येणाऱ्या शाळेचे भूमीपुजन अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते होणार आहे. या शाळेत गरीबांच्या मुलांना पुर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. हैदराबादमध्ये अशा प्रकारच्या ११ अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावतीने चालवल्या जातात.

Aimim Leader Akbaruddin Owasi
केंद्राची धोरणचं शेतकऱ्यांना विमा न मिळण्यास कारणीभूत ; फडणवीसांनी वजन वापरावे..

येथील सर्व खर्च ते स्वतः उचलतात. शैक्षणिक आणि धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून या शाळांचे व्यवस्थापन केले जाते. हजारो मुली आणि महिलांना येथे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच हजारो मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची महाराष्ट्रातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com