Aimim : वंचित-शिवसेनेची युती होताच, इम्तियाज यांच्याकडून राष्ट्रवादी-काॅंग्रेसला टाळी ?

Congress-Ncp : जेव्हा मुस्लिम समाज एमआयएमकडे वळला तेव्हा त्यांना आम्ही भाजपला मदत करणारे किंवा त्याची बी टीम वाटायला लागलो.
Mp Imtiyaz Jaleel News, Aurangabad
Mp Imtiyaz Jaleel News, AurangabadSarkarnama

Imtiyaz Jaleel : एमआयएमचा जुना मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करत नवा मित्र शोधला. यावर (Aimim) एमआयएमकडून सावध भूमिका घेत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. मात्र भाजपची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने आम्ही दिलेला युतीचा प्रस्ताव स्वीकारावा, असे म्हणत टाळी दिली आहे.

Mp Imtiyaz Jaleel News, Aurangabad
Supriya Sule On Devendra Fadnavis: जमत नसेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे संतापल्या..

इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्षभरापुर्वी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस (Congress-Ncp) सोबत युतीचा प्रस्ताव दिला होता. त्याची नव्याने आठवण करून दिली, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खासदार इम्तियाज जलील हे धुर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. टायमिंग साधत आरोप, युतीचे प्रस्ताव आणि त्यावर चर्चा घडवून आणत ते माध्यमांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत करून घेतात.

गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत युतीची घोषणा केली. त्याचे राजकीय पडसाद महाविकास आघाडीमध्ये उमटत असतांनाच इम्तियाज जलील यांनी पुन्हा राष्ट्रवादी-काॅंग्रेसला आपल्या जुन्याच युतीच्या प्रस्तावाची आठवण करुन दिली. इम्तियाज जलील म्हणाले, आमच्यावर भाजपला मदत करणारा, बी टीम असा आरोप काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व अन्य विरोधकांकडून केला जातो.

माझा त्यांना सवाल आहे, गेली ७० वर्ष या दोन्ही पक्षांनी विशेषतः काॅंग्रेसने मुस्लिमांचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला. याची जाणीव झाल्यानंतर जेव्हा मुस्लिम समाज एमआयएमकडे वळला तेव्हा त्यांना आम्ही भाजपला मदत करणारे किंवा त्याची बी टीम वाटायला लागलो. यावर देखील आम्ही वर्षभरापुर्वी त्यांना आम्हाला सोबत घ्या, एकत्रित निवडणूका लढवू, असा प्रस्ताव दिला होता.

त्यावर त्यांनी काही विचार केला नाही, मग आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? माझे आजही त्यांना आवाहन आहे, काॅंग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेऊन राज्यात निवडणुका लढवाव्यात, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com