एमआयएम आक्रमक; गुगलमॅप विरोधात तक्रार दाखल करणार

AIMIM| Asaduddin Owaisi| गेल्या 40 वर्षांपासून औरंगाबादच्या नामंतरणाचा प्रश्न प्रलंबित होता.
Aimim Chief Asaduddin Owaisi
Aimim Chief Asaduddin OwaisiSarkarnama

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न सोडवला. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर काही गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे. मात्र औरंगाबादच्या नामांतराला आता एमआयएमने (MIM) विरोध केला आहे.

गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर दाखवण्यात येत असल्याने एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयएम गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि बेकायदेशीर कृत्य करणे या कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून मिळाली आहे. यासोबतच केंद्रीय यंत्रणांकडे देखील तक्रार नोंदवणार असल्याचे एमआयमएमने म्हटले आहे.

Aimim Chief Asaduddin Owaisi
संघटनेला फायदा नसलेले खासदार बारणे गेल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही !

राज्यातील सत्तासंघर्षांच्या गदारोळात ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, तेव्हाही एमआएमने याला विरोध करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. शिंदे सरकारनेही सुरुवातील ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच पुन्हा औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अल्पमतात असताना ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला होता. काही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

दरम्यान गेल्या 40 वर्षांपासून औरंगाबादच्या नामंतरणाचा प्रश्न प्रलंबित होता. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र यावर कोणताही तोडगा निघत नव्हता. अखेर सत्तासंघर्षाच्या काळात ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या नामांतराला मंजूरी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या प्रस्ताव मंजुरीला विरोध केला नाही. मात्र एमआएमने या प्रस्तावाला विरोध केला. नवे सरकार येताच शिंदे सरकारनेही नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. अशात आता गुगल मॅपवर औरंगाबादऐवजी संभाजीनगर असे नाव दाखवण्यात येत असल्याने एमआयएम आक्रमक झाली आहे. गुगल मॅपविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराच एमआयएमने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in