Imtiaz Jalil News: इम्तियाज यांची महाविकास आघाडीनंतर आता पंकजा मुंडेंना ऑफर...

Imtiaz Jalil : एमआयएम राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी नव्या मित्राच्या शोधात आहे.
Imtiaz Jalil-Pankaja Munde News, Aurangabad
Imtiaz Jalil-Pankaja Munde News, AurangabadSarkarnama

Imtiaz Jalil : भाजपच्या मिशन लोकसभा प्रवास योजनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. चंद्रपूर, औरंगाबाद येथील सभेसाठी (Bjp) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातून दूर लोटले जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ही संधी साधत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना एमआयएमसोबत येण्याची ऑफर दिली.

Imtiaz Jalil-Pankaja Munde News, Aurangabad
Hingoli News: भाजपला दावा सांगू द्या, आम्हाला काही बोलायचे नाही असे आदेश आहेत..

पंकजाताई (Pankaja Munde) निर्णय घ्या, बाहेर पडा आणि ओबोसींची ताकद दाखवून द्या. भाजप तुमचा रबरी शिक्का म्हणून वापर करत आहे. ओबीसी आणि मुस्लिम एकत्र आले तर या महाराष्ट्रात काय घडू शकते हे दाखवून देवू, असे आवाहन देखील (Imtiaz Jalil) इम्तियाज जलील यांनी केले. जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे नाराज असल्याच्या किंवा त्यांना पक्षाकडून डावलले जाते, अशा चर्चा सुरू होतात. तेव्हा एमआयएमकडून त्यांना साद घातली जाते.

इम्तियाज जलील यांनी यापुर्वी देखील पंकजा मुंडे यांना निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत झालेले लोकसभा प्रवास योजनेच्या सभेत पंकजा मुंडे यांनी हेजरी लावली पण ती अध्यक्षांनी ऐनवेळी फोन करून उपस्थितीत राहण्यास सांगितले म्हणून. पण व्यासपीठावरील त्यांचा वावर आणि अवघ्या काही सेंकदात संपवलेले भाषण यावरून त्या नाराज असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना निर्णय घेवून एमआयएम सोबत येण्याचे आवाहन केले. तुम्ही निर्णय घेतला तर ओबीसींची मोठी ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील. ओबीसी आणि मुस्लिम समाज एकत्र आला तर या राज्यात निश्चितच परिवर्तन घडेल, असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला. वंचित आघाडी आणि शिवसेनेची युती होत असतांना इम्तियाज यांनी पंकजा मुंडेंना केलेल्या आवाहनाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

वंचित दूर गेल्यामुळे एमआयएमला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे एमआयएम राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी नव्या मित्राच्या शोधात आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीला हवा देत काही पदरात पडते का? असा प्रयत्न एमआयएमकडून सुरू असल्याचे बोलले जाते. यापुर्वी इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला देखील सोबत घेण्याचे आवाहन केले होते, पण पुढे त्याचे काय झाले? यावरून एमआयएमचे आवाहनाला पंकजा कितपत प्रतिसाद देतील, यावर त्या व्यक्त तरी होतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com