आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर औरंगाबाद शहरात येणार २० इलेक्ट्रिक बस

सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून शहराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी केंद्राचा ५०० कोटीचा तर राज्य व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटी रुपयांचा हिस्सा आहे.(Aurangabad Smart City)
Aditya Thackeray-Pandey
Aditya Thackeray-PandeySarkarnama

औरंगाबादः स्मार्ट सिटी अभियानात (Smart City) महापालिकेला २५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा टाकावा लागणार आहे. त्यासाठी कर्ज घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक व कार्बन झिरो बाँडच्या विक्रीतून हे कर्ज घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे महापालिकेचे (Aurangabad Municipal Corporation) प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. कार्बन झिरो मोहिमेंतर्गत शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी २० इलेक्ट्रिक बस (Electric Bus) खरेदी करणार असल्याचे पांडेय म्हणाले.

औरंगाबाद शहराची २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली होती. पाच वर्षात सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून शहराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी केंद्राचा ५०० कोटीचा तर राज्य व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटी रुपयांचा हिस्सा आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून २९४ कोटीचा निधी आत्तापर्यंत प्राप्त झाला आहे. महापालिकेने स्वहिस्सा २५० कोटी रुपये भरल्याशिवाय पुढील निधी दिला जाणार नाही, असा पवित्रा केंद्र शासनाने घेतला आहे. दरम्यान महापालिकेने ६५ कोटी रुपये स्मार्ट सिटी अभियानासाठी जमा केले आहे. उर्वरित निधीसाठी ३०० कोटीचे कर्ज काढण्याची तयारी सुरू आहे.

कर्जासाठी विविध बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या संदर्भात पांडेय म्हणाले, महापालिकेने कार्बन झिरो बाँड विक्रीतून कर्ज घेण्याची तयारी केली आहे. तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून काही कर्ज घेण्यात येईल. पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण कमी करणारी वाहने खरेदी करण्याच्या सूचना केली आहे.

Aditya Thackeray-Pandey
अब्दुल सत्तार म्हणतात, खोतकरांचा व्यवहार पारदर्शक, कागदोपत्री चूक झाली असेल..

त्यानुसार स्मार्ट सिटीतून पर्यटकांसाठी २० स्मार्ट इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना सौर ऊर्जेवर चालविण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. त्यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे. त्यासोबतच कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी देखील सौर उर्जेचा वापर करता येईल का? याची चाचपणी केली जाणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com