Marathwada : `भारत जोडो`च्या उत्कृष्ट नियोजनानंतर चव्हाणांवर आणखी एक मोठी जबाबदारी..

सोनिया गांधी, राहुल, प्रियकां, द्विगविजय सिंग, मलिक्कार्जून खर्गे, कमलनाथ, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हय्या कुमार, भुपेद्र सिंग हुड्डा या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Congress)
Ashok Chavan  News, Aurangabad
Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील स्वागतासाठी केलेल्या उत्कृष्ट नियोजनानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काॅंग्रेस आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील निवडणुक प्रचारासाठी अशोक चव्हाण यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Ashok Chavan  News, Aurangabad
Chikhlikar : `भारत जोडो`त हिरारीने सहभाग घेतला तरी अशोक चव्हाण भाजपमध्ये येवू शकतात..

काॅंग्रेसकडून देशभरातील ४० स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. यात स्वतः सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा देखील समावेश आहे. (Congress) महाराष्ट्रातून फक्त दोघांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली असून दुसरे नाव विदर्भातील शिवाजीराव मोघे यांचे आहे. (Ashok Chavan) राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या आठवड्यात तेलंगाणातून महाराष्ट्रात दाखल झाली होती.

नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या या यात्रेचा नांदेड जिल्ह्यात ५ दिवस आणि चार मुक्काम होते. या दरम्यान, यात्रेचे उत्कृष्ट नियोजन अशोक चव्हाण यांनी केले होते. यात्रेला प्रचंड प्रतिसाद नांदेड जिल्ह्यात मिळाला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे या दोन राज्यातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदी-शहांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस सोबत आम आदमी पक्षाची देखील एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत शंभरच्या आत रोखले होते. आता काॅंग्रेस कशी कामगिरी करणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची धुरा या ४० स्टार प्रचारकांवर असणार आहे. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियकां गांधी, द्विगविजय सिंग, मलिक्कार्जून खर्गे, कमलनाथ, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हय्या कुमार, भुपेद्र सिंग हुड्डा या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com