
Marathwada Politics : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ला मोठं गिफ्ट दिलं आहे. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पण आता राज्य सरकारने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन संपूर्ण जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्याचंही नामांतर धाराशिव असे करण्यात आले आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारने औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' असे करण्याची घोषणा केली होती.मात्र या नामांतरात अनेक अडचणीही होत्या.अखेर या अडचणींवर तोडगा काढून आज सकाळीच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नामांतरावर शिक्कामोर्तब केले.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रीमंडाची बैठक होत आहे.या बैठकीनिमित्त त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने राजपत्र प्रकाशित करुन दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलल्यामुळे यापुढे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे असेल.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठक होणार आहे. मराठवाड्याला काय मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.मराठवाड्यासाठी राज्य सरकारकडून एकूण 40 हजार कोटींचे पॅकेज जाहीर होऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता मराठवाड्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तसेच, सध्या मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती असल्याने नुकसान भरपाई देखील बाकी आहे. या दृष्टीने मराठवाड्याला ही नुकसान भरपाई मिळणार का,असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील आरोग्य, सिंचन, शेती, दळणवळण, अन्य विभागांकडून 40 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.