विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा जाहीर : संतोष बांगरांसाठी करणार बॅटिंग

शिंदे यांच्या बंडामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीच आमदार संतोष बांगर हे सहभागी झाले होते. त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री दौरा करत आहेत. (Nanded)
Cm Tour At Nanded, Hingoli News
Cm Tour At Nanded, Hingoli NewsSarkarnama

नांदेड : सातत्याने दौरे, बैठका, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी अशा व्यस्थतेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. (Nanded) डाॅक्टारांनी त्यांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण एक दिवस विश्रांती घेतल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा सक्रीय झाले होते. बंडामध्ये भक्कम साथ देणाऱ्या आमदारांना बळ देण्यासाठी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या दौरा जाहीर केला होता.

त्यानूसार ते नाशिक, औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा देखील केला. मात्र दिवसाचे २०-२२ तास दौरे आणि कार्यक्रमांमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाऊ शकले नाहीत.(Hingoli) पण एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा सक्रीय झाले, त्याने नियोजित कार्यक्रम घ्यायला सुरूवात केली आहे.

उद्या ते मराठवाडा दौऱ्यावर येत असून रविवारी (ता. ७) रोजी ते नांदेड जिल्ह्यात येत आहेत. रविवार थेट दिल्लीहून मुख्यमंत्री विमानाने श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे रात्री सव्वा नऊ वाजता येतील. साडे नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ते हुजुर साहिब गुरुद्वाराला भेट देणार आहेत.

त्यानंतर ११.१५ ते १२.१५ एक तास ते हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी असणार आहेत. त्यानंतर नांदेड मनपा अंतर्गत शहरातील उत्तर मतदार संघातील मुलभूत सुविधा कामांचे भूमीपुजन, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव निळा नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पुर्णा नांदेड रस्त्याच्या दुपदरीकरणाचे भूमीपुजन, आसना नदीवरील पासदगाव जवळील पूलाचे भूमीपुजन, नांदेड उत्तर मतदार संघातील पुरग्रस्त बाधित भागाची पाहणी ते करणार आहेत.

Cm Tour At Nanded, Hingoli News
shivsena : दोन वर्ष ताटकळत ठेवल्यानंतर तनवाणींची महानगरप्रमुख पदावर बोळवण..

दुपारी भक्ती लॉन्स येथे शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समर्थनार्थ हा मेळावा होणार आहे. मेळाव्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. दुपारी २ वाजता मोटारीने मुख्यमंत्री हिंगोलीकडे रवाना होणार असून तिथेही आमदार संतोष बागंर यांच्या समर्थनार्थ मेळावा, विविध विकासकामांचे लोकार्पण, नव्या कामांचा शुभारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत.

सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री पुन्हा नांदेड विमानतळावर येतील आणि पावणे आठ वाजता मुंबईला रवाना होतील. शिंदे यांच्या बंडामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीच आमदार संतोष बांगर हे सहभागी झाले होते. या यशस्वी बंडानंतर आता त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दौरा करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com