`मुंडे साहेबानंतर भाजपमध्ये अवहेलना; म्हणूनच पक्ष सोडतोय; पंकजांनीही निर्णय घ्यावा`

परभणी जिल्ह्यात काॅंग्रेसमधून आलेल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपात (BJP घेऊन त्यांना शुद्ध करण्याचे प्रकार फक्त सुरू आहेत.
Vijay Gavhane-Pankaja Munde
Vijay Gavhane-Pankaja MundeSarkarnama

औरंगाबाद : स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत वीस वर्षापुर्वी मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Late Gopinath Munde) पण त्यांच्या पश्चात सातत्याने पक्षात अवेहलना झाली. (Bjp) तरी इतकी वर्ष संयम बाळगून काम करत राहिलो, पण आता सहनशिलतेचा अंत झाला आहे. (Parbhani) भाजपमध्ये बहुजनांना डावलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपमधून राष्ट्रवादीत (Ncp) उद्या प्रवेश करणारे माजी आमदार व परभणीतील नेते विजय गव्हाणे यांनी सांगितले.

गव्हाणे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण ज्या दिवशी मुंडे साहेबांचे निधन झाले तेव्हापासून मी दिल्लीत पाय देखील ठेवलेला नाही. भाजपमध्ये आता बहुजन नेतृत्वाला डावलण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील पक्षातून चुकीची वागणूक मिळत आहे.

पक्ष त्यांना व्यथित करत आहे, त्यांनी देखील आता गुदमरण्यापेक्षा निर्णय घेतला पाहिजे. पक्षात एक विचारसरणी आहे जी सातत्याने बहुजनावर अन्याय करत आहे, असा आरोप देखील गव्हाणे यांनी केला.आपण अनेकदा देवेंद्र फडणवीस यांना भेटलो पण, आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही.

परभणी जिल्ह्यात काॅंग्रेसमधून आलेल्या भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन त्यांना शुद्ध करण्याचे प्रकार फक्त सुरू आहेत, असा आरोप गव्हाणे यांनी केला. भाजपमध्ये प्रामाणिक नेते, पदाधिकाऱ्यांनी घुसमट होत आहे हे अनकेदा स्पष्ट झाले.

Vijay Gavhane-Pankaja Munde
जात विचारणाऱ्या बिल्डर, कर्मचाऱ्यांना वकिलाचा दणका; सहा जणांवर अ‍ॅट्रॉसिटी

एकनाथ खडसे यांच्या सारख्या नेत्याने पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भविष्यात घुसमट होणारे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी प्रवेश करतील, असे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com