मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर कैलास पाटील यांचं उपोषण मागे

Kailas Patil| शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैलास पाटील मागील सहा दिवसापासून आमरण उपोषण करत होते.
Mla Kailas Patil News, Osmanabad
Mla Kailas Patil News, OsmanabadSarkarnama

Osmanabad Farmers Agitation : उस्मानाबाद :  गेल्या सहा-सात दिवसांपासून आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरुनता मागे घेतले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जारीह केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार आणि शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख कैलास पाटील (Kailas Patil) मागील सहा दिवसापासून आ. पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. सहा- सात दिवसांनंतर अखेर आज कैलास पाटील यांच्या आंदोलनाचा मुजोर पिक विमा कंपनीला दणका बसला आहे.

उपोषणातील मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार न घेण्यावर आमदार कैलास पाटील ठाम भूमिका घेतली होती. दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कुलूप बंद आंदोलन आणि टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अनेक ठिकाणी बसेसचीही तोडफोड करण्यात आली. त्यानंतर एसटी सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आली होती

२०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, ५३१ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईचा विमा रक्कमेत कोणतीही छुपी कपात करु नये. २०२१ च्या पीकविम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयांची रक्कम विमा पात्र सहा लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com