चार वर्षांच्या खंडानंतर आडसकरांच्या पाडवा स्नेहमिलनाला गर्दी

(Bjp Leader Ramesh Adaskar) ४० वर्षांपासून आडस या त्यांच्या मुळ गावी दिवाळी पाडवा स्नेहमिलनाची परंपरा होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन व नंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव यामुळे चार वर्षांपासून ही परंपरा खंडीत होती.
Bjp Leader Ramesh Aadaskar
Bjp Leader Ramesh AadaskarSarkarnama

केज : जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात एकेकाळी अधिराज्य गाजविणारे रांगडे व्यक्तीमत्व हाबाडा फेम म्हणून माजी आमदार‌ दिवंगत बाबुराव बाबूराव आडसकर यांची ओळख होती. आडसकरांनी सर्वच घटकांशी जपलेल्या आपुलकीच्या नात्याचा प्रत्यय नुकताच आला. पुन्हा एकदा त्यांचे चिरंजीव व राजकीय वारसदार रमेश आडसकर यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पाडव्याच्या स्नेहभेटीच्या कार्यक्रमात आडस निवासस्थानी जमलेल्या गर्दीतून दिसून आला.

केज, अंबाजोगाई, धारूर व माजलगाव व तालुक्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, शेतकरी, व्यापारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सकाळपासून आडसकरांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांची ४० वर्षांपासून आडस या त्यांच्या मुळ गावी दिवाळी पाडवा स्नेहमिलनाची परंपरा होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन व नंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव यामुळे चार वर्षांपासून ही परंपरा खंडीत होती.

मात्र, आता कोरोना ओसरु लागल्याने रमेश आडसकर यांनी चार वर्षांच्या खंडानंतर दिपावली पाडवा स्नेहमीलन आयोजित केले. मोठ्या खंडानंतरही झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आडसकर आणि समर्थकांचे अतुट नाते आणि एकमेकांप्रतीचा स्नेह या निमित्ताने पुन्हा अधोरेखीत झाला. उलट गर्दीमध्ये पुर्वीच्या अंबाजोगाई, केज, धारुरसह आता माजलगाव व वडवणी तालुक्यांतील समर्थकांचीही भर पडली.

प्रवेशद्वारावरच आडसकरांच्या तिसऱ्या पिढीतील उपसभापती ऋषिकेश आडसकर, शशी आडसकर, कृष्णा आडसकर व रणजित आडसकर हे पाहुण्यांच्या स्वागत करत होते. तर आत मंडपात रमेश आडसकर येणाऱ्यांशी संवाद साधून फराळ करण्याचा आग्रह करत होते.

यावेळी माजी आमदार मोहनराव सोळंके, राजकिशोर मोदी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अंकुश इंगळे, विलास सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य भागवत नेटके, केज बाजार समितीचे सभापती लक्ष्मीकांत लाड, धारुर बाजार समितीचे सभापती सुनिल शिनगारे, भाजप माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत, वडवणीचे पोपट शेंडगे, विष्णू घुले, संभाजी इंगळे, उद्वव इंगोले, सरपंच बालासाहेब ढोले, दगडू सावकर, धैर्यशिल विडकेर, बाळासाहेब देशमुख व रमेश ढोले उपस्थित होते.

दरम्यान, दिवंगत बाबूराव अाडसकर यांचे निधन व नंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे चार वर्षांपासून आडसकरांची चाळीस वर्षांची पाडवा स्नेहमिलनाची परंपरा चार वर्षांपासून खंडीत होती. पण, रमेशराव आडसकर यांनी पुन्हा ही परंपरा सुरु केली आणि त्यांच्या स्नेहीजन व समर्थकांनी उपस्थिती दाखवून एकमेकांप्रतींचा स्नेहभाव दाखवून दिला.

Bjp Leader Ramesh Aadaskar
रेशीम-सिताफळ उत्पादकांसाठी जयदत्त क्षीरसागरांनी उपलब्ध करुन दिली बाजारपेठ

निवासस्थानी उभारण्यात आलेल्या सभामंडपात पाडवा कार्यक्रमात बसून आलेल्या सवंगड्याच्याची आस्थेवाईकपणे विचारपूस करणाऱ्या दिवंगत आमदार बाबुराव आडसकर यांचा फोटो पाहून उपस्थितांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्याने अनेकजण भावूक झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com