Latur Congress News : काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या निलंगा खरेदी-विक्री संघावर ६३ वर्षानंतर भाजपचे वर्चस्व..

Bjp : २०५ सभासद असलेल्या या खरेदी विक्री संघावर ६३ वर्षानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व मिळवले.
Latur Congress News
Latur Congress NewsSarkarnama

Nilanga : निलंगा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली असून त्यामध्ये मुख्य प्रशासकपदी सत्यवान धुमाळ यांची निवड झाली आहे. (Latur Congress News) आज मंगळवारी (ता. नऊ) रोजी त्यांनी पदभार स्विकारला. या संघावर प्रशासकीय नऊ संचालक मंडळाचा समावेश करण्यात आला असून जवळपास ६३ वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याने हा संघ भाजपाच्या ताब्यात गेला आहे.

Latur Congress News
Shivsena (UT) Deligation Meet Municipal Administrator : नागरी समस्या सोडवा, शिवसेनेचे नव्या आयुक्तांना साकडे..

(Congress) काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या सहकार संघाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या राजकारणाची सुरवात देखील येथून झाली होती. (Latur) या खरेदी विक्री संघाचे ते चेअरमन राहीले असून काँग्रेसकडून सुधाकर नायब, बाबुराव देशमुख, बाबुराव नितनवरे, शरद पाटील निलंगेकर आदींनी या संघाचे नेतृत्व केले आहे. राज्यामध्ये अनेक सत्तांतर झाले मात्र हा संघ काँग्रेसकडेच होता.

२०५ सभासद असलेल्या या खरेदी विक्री संघावर ६३ वर्षानंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेसचे म्हणजेच भाजप व शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी नवीन अशासकीय प्रशासक मंडळाची नुकतीच नियुक्ती केली असून मुख्य प्रशासक म्हणून माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचे विश्वासू समजले जाणारे सत्यवान तात्याराव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर प्रशासक संचालक म्हणून मनोज महादेव कोळ्ळे, अण्णाराव रामचंद्र जाधव, व्यंकटगिर बुध्दगीर गीरी, मनोज व्यंकटराव पाटील, दयानंद बळवंतराव धुमाळ, विक्रांत सुधीर पाटील, भगवान व्यंकटराव जाधव, कुलदीप देशमुख यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. मुख्यप्रशासक सत्यवान धुमाळ व सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने आज दुपारी पदभार घेतला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77-अ मधील तरतूदीन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आर. एल. गडेकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. निलंगा, यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

निलंगा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. निलंगा या संस्थेवर नविन संचालकाची पुढील निवडणूक आदेश येईपर्यंत अथवा समितीची निवडणूक होऊन आलेल्या समितीच्या पहिल्या सभेपर्यंत यापैकी जो कालावधी कमी असेल तो पर्यंत अशासकीय प्रशासकीय मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेशात नमुद केले आहे. संभाजी पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघातील अनेक शासकीय योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून गतवैभव मिळवून देऊ, असे अश्वासन यावेळी नुतन मुख्य प्रशासक सत्यवान धुमाळ यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com