केजमध्ये आडसकरांची खेळी यशस्वी; रजनी पाटलांना धक्का

यापूर्वी भाजपचे आडसकर यांच्या समर्थकांच्या पाठींब्यावरच नगर पंचायतीवर काँग्रेसला सत्ता मिळविता आली होती. (Ramesh Adaskar, Beed)
Rajani Patil- Ramesh Adaskar
Rajani Patil- Ramesh AdaskarSarkarnama

केज : नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात बुधवारी धक्कादाय निकाल लागले. काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी चिंतन करायला लावणारा निकाल लागला. (Bjp)भाजपचे नेते रमेश आडसकर यांची खेळी यशस्वी ठरली. (Congress) केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजपच्या आमदार नमिता मुंदडा करत आहेत. मात्र, निवडणुकीत पक्ष चिन्हावर उतरला नाही. (Beed)

या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महाविकास आघाडीतील पक्षही स्वतंत्र निवडणुक रिंगणात उतरले. तर, हारुण इनामदार यांच्या नेतृत्वाखाली जनविकस आघाडीही रिंगणात उतरली. या आघाडीला भाजपचे नेते रमेशराव आडसकर यांनी पाठबळ दिले. त्यांचे समर्थक आघाडीकडून रिंगणात उतरले. निकालात सर्वाधिक आठ जागा या जनविकास आघाडीने जिंकल्या आहेत.

काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची नगर पंचायतीवरील सत्ता गेली आहे. पक्षाला केवळ तीन जागा जिंकता आल्या. तर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रवादीला पाच जागा जिंकता आल्या असल्या तरी त्यांच्या कन्या डॉ. हर्षदा यांचा पराभव झाला.

Rajani Patil- Ramesh Adaskar
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांच्या गावातच पक्षाचे पानीपत

यापूर्वी भाजपचे आडसकर यांच्या समर्थकांच्या पाठींब्यावरच नगर पंचायतीवर काँग्रेसला सत्ता मिळविता आली होती. आता त्यांनी पाठबळ दिलेली आघाडी सत्तेच्या जवळ आली आहे.केज नगर पंचायतीवर खासदार रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती. त्यांचे पुत्र आदित्य पाटील नगराध्यक्षही होते. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com