
Aurangabad News : राज्यभर गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Scams) न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात ही अटक झाली असून आदर्श पतसंस्थेविरोधात २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
तपासासाठी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केलेली आहे. सध्या विशेष तपास पथकच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास सुरु आहे. (Scams) पोलिसांनी सतीश खरे यांना मंगळवारी अटक केली असून, त्यांना पाच दिवसाची म्हणजे ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Aurangabad) सतीश खरे हे सन २०१६ ते २०१८ या काळात जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत होते.
गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाचे पोलीस निरीक्षक एस. बी. पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत. (Crime) दरम्यान हर्सूल कारागृहातील आरोपी नामदेव दादाराव कचकुरे (वय ४८, रा. शेंद्र कमंगर, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि आरोपी सुनिल अंबादासराव पाटील (वय ५१, रा. एन-६, सिडको) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न होत असल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा ताब्यात घेवून त्यांची पोलिस कोठडी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
पूर्वी अटक झालेले सुनंदा अनिल पाटील (वय ५०, रा. शिवज्योती कॉलनी, एन-६) वनिता सुनिल पाटील (वय ४२ रा. शिवज्योती कॉलनी, एन-६) याचे जामिन अर्जही न्यायालयाने फेटाळले आहेत. दरम्यान,आदर्श पतसंस्थेच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मालमत्ता संरक्षित करण्याची कारवाई सुरु आहे.
तक्रारदारांनी त्यांचे तक्रार अर्ज व त्यासोबत पतसंस्थेची एफडी, बचतखाते, आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत जोडून अर्ज पोलिस आयुक्त कार्यालयातील आवक जावक शाखेत जमा करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी कालच ठेवीदारांना सोबत घेत सहनिंबधक कार्यालयातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी थाळीनाद आंदोलन केले होते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.