Osmanabad DPDC Meeting
Osmanabad DPDC MeetingSarkarnama

तानाजी सावंत-ओमराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये उस्मानाबादमध्ये राडा

सभागृहाच्या बाहेर सुमारे १५ ते २० मिनिटे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची जुगलबंदी सुरू होती. दोन्ही गट एकमेकांना बोट दाखवत होते.

उस्मानाबाद : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. नियोजन समितीच्या सभागृहात प्रवकश देण्यावरून दोन्ही गट एकमेकांसमोर आले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना परिसरातून बाहेर काढले. (Activists of Tanaji Sawant and Omraje Nimabalkar came face to face in Osmanabad)

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रथमच नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Osmanabad DPDC Meeting
मोठी बातमी : आशिष शेलार यांना राष्ट्रीय स्तरावर संधी; जय शहांचा पुढाकार

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत येताच ते सभागृहाकडे वळले. त्यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते सावंत यांच्यासोबत सभागृहात जाण्याचा प्रयत्न करत होते. पण, पोलिसांनी त्यांना रोखले. मात्र, काही काळानंतर ठराविक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत आरडाओरड केली. चांगलीच तणावाची परिस्थिती तयार झाली होती. त्यामुळे पोलिसांनी सभागृहात कोणालाही प्रवेश दिला नाही.

Osmanabad DPDC Meeting
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांवरून सुप्रीम कोर्टाकडून शिंदे-फडणवीस सरकारची कानउघडणी

सभागृहाच्या बाहेर सुमारे १५ ते २० मिनिटे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची जुगलबंदी सुरू होती. दोन्ही गट एकमेकांना बोट दाखवत होते, अखेर पोलिसांनी सभागृहाच्या परिसरातून दोन्ही गटांना बाहेर काढले. याचवेळी काही कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला उभे होते. त्यांनाही बाहेर काढा, असे म्हणत दोन्ही गट एकमेकांकडे बोट दाखवत होते. पोलिसांना अखेर समान न्याय देत दोघांनाही बाहेर काढल्याने परिसरात शांतता निर्माण झाली. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा बैठकीपूर्वीच घोषणाबाजीने राडा रंगला. समितीच्या सभागृहात प्रवेश देण्यावरून दोन्ही गट एकमेकांसमोर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in