Mla Satish Chavan News : शौचालय अनुदानातील अपहार प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होणार..

Vidhan Parisad : शासन नेहमी केवायसी-डीबीटीव्दारे लाभार्थ्यांना अनुदान देते. मग एनएफटीव्दारे अनुदान कसे दिले?
Mla Satish Chavan, News
Mla Satish Chavan, NewsSarkarnama

Marathwada : गंगापूर तालुक्यातील वैयक्तीक स्वच्छतागृहाच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात अनियमितता झाली असेल तर दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. गंगापूर तालुक्यातील वैयक्तीक स्वच्छतागृहाच्या अनुदान वाटपात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारा संदर्भात आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

Mla Satish Chavan, News
Protest Against Name Change News : इम्तियाज यांची भिती खरी ठरली, आंदोलनाचा मंडप ओस पडला..

गंगापूर तालुक्यातील स्वच्छ भारत अभियान ग्रामीण फेज-२ अंतर्गत वैयक्तीक स्वच्छतागृहासाठी १८०० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. (Ncp) त्यापैकी ११४९ अर्जदारांनी केलेल्या अर्जास वैयक्तीक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यासाठी मान्यता मिळाली. (Budget Session) स्वच्छतागृहाचे शासनाकडून मिळणारे प्रत्येकी १२ हजार रूपयाचे अनुदान गंगापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना न देता अधिकार्‍यांनी लाभार्थ्यांना अनुदान वाटप केल्याचे दाखवून अपहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या संदर्भात सतीश चव्हाण यांनी विधी मंडळाकडे १० जानेवारी २०२३ रोजी तारांकित प्रश्न दाखल केला. आपला भांडाफोड होणार असल्याचे कळताच अधिकार्‍यांनी फेब्रुवारी 2023 च्या शेवटच्या आठवाड्यात एनएफटीव्दारे लाभार्थ्यांना अनुदान दिल्याचे चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शासन नेहमी केवायसी-डीबीटीव्दारे लाभार्थ्यांना अनुदान देते. मग एनएफटीव्दारे अनुदान कसे दिले?

असा प्रश्न उपस्थित करून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी चव्हाण यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना पाणी पुरवाठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सदरील लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान द्यायला हवे होते हे मान्य करत सदरील प्रकरणात अनियमितता झाली असेल तर दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com