Abdul Sattar : दोन दिवसांत तुम्ही वरळीतून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून देतो..

हिंदू बहुल मतदारसंघातून मुस्लिम समाजाचे सत्तार सलग पंधरा वर्ष निवडून येतात यातच सगळं आलं. (Minister Abdul Sattar)
Abdul Sattar-Aditya Thackeray News, Aurangabad
Abdul Sattar-Aditya Thackeray News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना `तुम दारू पिते क्या`, असे विचारले आणि त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली. विरोधकांना आयते कोलित मिळाले आणि पुन्हा सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. युवासेनेचे अध्यक्ष आमदार आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यात आघाडीवर होते. अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यायाला पाहिजे, पण मुख्यमंत्र्यांना ते जमणार आहे का? असा टोला त्यांनी लगावला होता.

Abdul Sattar-Aditya Thackeray News, Aurangabad
Aurangabad : खरचं बागडेंना लढाईचे नाही ? की त्यांनी गुगली टाकली..

यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून प्रतिक्रिया आली नाहीतर नवलच. आदित्य ठाकरे यांना छोटा पप्पूची उपाधी दिल्यानंतर काल नंदुरबारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोरच सत्तारांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आणखी एक आव्हान दिले. दोन वर्ष कशाला दोन दिवसांत राजीनामा देतो, तुम्ही वरळी मतदारसंघातून द्या, मी सिल्लोडमधून देतो. एकदाचा खळे होवूच द्या, अशा शब्दात सत्तारांनी आदित्य ठाकरे यांना डिवचले.

शिंदे गटाने बंड पुकारले तेव्हा पासून आदित्य ठाकरे यांनी सगळ्या आमदारांना एकदा राजीनामा देवून पुन्हा निवडूण येवून दाखवा, असे आव्हान देत राज्यभरातून निष्ठा यात्रा काढली होती. अब्दुल सत्तार हे देखील ठाकरे यांच्या निशाण्यावर होते. यापुर्वी देखील सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले होते.

सत्तार गेल्या पंधरा वर्षापासून सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दोनवेळा ते काॅंग्रेसच्या तर गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते निवडूण आले होते. नगरपरिषदेसह मतदारसंघातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असलेल्या सत्तारांचा वावर जिल्हा आणि राज्यपातळीवर दिसून येतो. सत्तेचा सर्वाधिक उपयोग मतदारसंघात निधी खेचून आणण्यासाठी सत्तार करतांना दिसतात. त्यामुळे मतदारंसघात सत्तारांचा शब्द सहसा खाली जात नाही.

२५-३० वर्षाच्या राजकारणात त्यांनी मतदारसंघात प्रबळ असा विरोधकच तयार होवू दिला नाही, त्यामुळे सत्ता कायम त्यांच्याकडेच येत गेली. हिंदू बहुल मतदारसंघातून मुस्लिम समाजाचे सत्तार सलग पंधरा वर्ष निवडून येतात यातच सगळं आलं. या सत्तेचा जोर आणि मतदारांवर असलेल्या विश्वास या बळावरच सत्तारांची मर्जी चालते.

त्यामुळेच ठाकरेंना आव्हान देण्याची भाषा ते करत आहेत. गर्दीसमोर भाषण ठोकतांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात असले तरी ना ठाकरे आमदारकीचा राजीनामा देतील, ना सत्तार. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील याकडे करमणूक म्हणूनच पाहत असतील एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in