Abdul Sattar organize Shiv Mahapuran News
Abdul Sattar organize Shiv Mahapuran NewsSarkarnama

Abdul Sattar organize Shiv Mahapuran News : अब्दुल सत्तारांनाही शिवमहापुराण कथेची भूरळ, मतदारसंघात करणार आयोजन..

Marathwada : प्रदीप जैस्वाल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील ४० एकर जागेवर शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते.

Shivsena : शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी छत्रपती संभाजीनगरात १ ते ७ जून दरम्यान पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. (Abdul Sattar organize Shiv Mahapuran News) आज कथेचा समारोप झाला, तेव्हा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हजेरी लावली. यावेळी पं.पू.पंडीत प्रदीप मिश्रा यांचे आशिर्वाद घेत सत्तार यांनी सिल्लोडमध्ये शिवमहापुराण कथेसाठी वेळ देण्याची गळ त्यांना घातली.

Abdul Sattar organize Shiv Mahapuran News
Sharad Pawar In Action News : बैठकीत जालना लोकसभा मतदारसंघावर दावा अन् पवार थेट जिल्ह्यात...

महाराजांनी देखील नक्कीच तुम्हाला वेळ देवू, असे आश्वासन सत्तार यांना दिले. त्यामुळे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून देखील त्यांच्या मतदारसंघात शिवमहापुराण कथेचे आयोजन झाले तर नवल वाटायला नको. मराठवाड्यात याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी परभणीत मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते.

त्यानंतर मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल (Prdeep Jaiswal) यांनी छत्रपती संभाजीनगरात कथेचे आयोजन करण्यासाठी पंडीत प्रदीप मिश्रा यांच्याशी संपर्क साधला होता. ऐनवेळी एक कथा परवानगीअभावी रद्द झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरात (Shivsena) कथा करण्यात महाराजांनी होकार दिला होता. त्यानंतर अवघ्या सात दिवसात प्रदीप जैस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील ४० एकर जागेवर शिवमहापुराण कथेची तयारी केली होती.

१ ते ७ जून दरम्यान, लाखो भाविकांनी या कथेचा लाभ घेतला. मराठवाड्यासह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून भाविक कथा ऐकण्यासाठी आले होते. आज कथेचा समारोप असल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी हजेरी लावत पंडीत मिश्रा यांचे आशिर्वाद घेतले. सत्तार यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचा पुष्पहार, शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.

सिल्लोड येथे शिव महापुराण कथेसाठी वेळ द्यावा, अशी विनंती देखील सत्तार यांनी केला. यावर मिश्रा यांनी निश्चितपणे सिल्लोडसाठी लवकरच वेळ देऊ असा शब्द दिला. याआधी शिवमहापुराण कथेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे यांनी देखील हजेरी लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com