Abdul Sattar : जिकडे जातो तिकडे.. माझ्या नावातच सत्ता..

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि मंत्रीपद मिळाले. अडीच वर्ष होऊन शिंदे यांच्यासोबत सत्तेतून बाहेर पडलो आणि आता तेच मुख्यमंत्री झाले. (Abdul Sattar)
Ex.Minister Abdul Sattar, Aurangabad News
Ex.Minister Abdul Sattar, Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : माझ्या नावतील `र` शब्द काढला तर उरते सत्ता, त्यामुळे मी जिकडे जातो, त्या पक्षाची सत्ता येते आणि मला मंत्रीपदही मिळते. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलो आणि सत्ता आली, त्यामुळे पुन्हा मंत्री म्हणून येणारच, असा दावा माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारानिमित्त अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार येत्या तीन-चार दिवसांत होण्याची शक्यता आहे. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे यांच्या बंडाला मोठा पाठिंबा मिळाला होता, सात पैकी पाच आमदार बाहेर पडल्यामुळे सहाजिकच जिल्ह्यात मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सूकता लागली आहे.

औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट व सिल्लोड-सोयगावचे अब्दुल सत्तार हे दोघे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. पैकी शिरसाट हे मुळचे शिवसेनेचे तर सत्तार हे २०१९ च्या विधानसभेवेळी पक्षात दाखल झालेले. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपद देतांना मुख्यमंत्री शिंदे कोणाला झुकते माप देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्यासमोरील शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने सत्तार यांनी आपली मंत्री होण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. सत्तार म्हणाले, माझ्या ३५-४० वर्षाच्या राजकीय जीवनात मला कधीही विरोधी पक्षात बसावे लागले नाही. काॅंग्रेसमध्ये होतो तेव्हाही सत्ता आणि मला मंत्रीपद होते. शिवसेनेत गेलो तेव्हा राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि मंत्रीपद मिळाले.

Ex.Minister Abdul Sattar, Aurangabad News
Shivsena : खैरे म्हणाले गद्दारांची हकालपट्टी होणार अन् युवासेनेच्या जंजाळची उचलबांगडी..

अडीच वर्ष होऊन शिंदे यांच्यासोबत सत्तेतून बाहेर पडलो आणि आता तेच मुख्यमंत्री झाले. हा योगायोग म्हणा की मग माझ्या नावात सत्ता असल्यामुळे म्हणी मी नेहमीच सत्ताधारी पक्षात राहिलो आहे. त्यामुळे मी पुन्हा मंत्री म्हणून येईल, असा विश्वास मला वाटतो. शिंदे हे वेगवान आणि दिवसाचे १५-१६ तास करणारे मुख्यमंत्री आहेत.

माझ्या राजकीय आयुष्यात जितका निधी मतदारसंघात मिळाला नव्हता तेवढा शिंदेसाहेबांनी फक्त चारच दिवसांत दिला. मी सत्ता किंवा मंत्रीपदासाठी नाही, तर मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे यांच्यासोबत गेलो, याचा पुनरुच्चार देखील सत्तार यांनी केला. यावेळी बंडाच्या काळात सुरत, गुवाहाटी आणि गोवा येथील मुक्कामाच्या गंमती-जंमती देखील सत्तार यांनी खास आपल्या शैलीत सांगितल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in