Abdul sattar : मंत्रीपदाबाबत सत्तारांचे सूर मवाळ, शिंदेनी निधी देऊन बोळवण केली ?

औरंगाबाद जिल्ह्याला आधीच दोन मंत्री होते. भुमरे कॅबिनेट तर सत्तार राज्य. आता सत्तारांना कॅबिनेट हवे आहे, तर संजय शिरसाट हे देखील मंत्रपदााठी आग्रही आहे. (Abdul Sattar)
Eknath Shinde News, Aurangabad latest Marathi News, Sambhaji Nagar News
Eknath Shinde News, Aurangabad latest Marathi News, Sambhaji Nagar NewsSarkarnama

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व अपक्ष असे एकून ५० आमदारांनी केलेले बंड यशस्वी ठरले. राज्यात सत्तांतर होऊन अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री झाले. बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल देखील शिंदे गटाच्या पथ्यावर पडल्याचे सध्या तरी चित्र आहे. आता मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ५० पैकी किती आमदारांच्या गळ्यात मंत्री किंवा राज्यमंत्री पदाची माळ पडते हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. (Abdul Sattar Latest Marathi News)

पण कालपर्यंत दावेदार म्हणून ओळखले जाणारे माजीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काल मतदारसंघात परतल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी होती. सत्तार म्हणाले, मला मंत्रीपदाची आशा नाही, कार्यकर्ता हेच पद माझ्यासाठी मोठे आहे. (Aurangabad) त्याचा हा बदललेला सूर मंत्रीपदासाठी चाललेली रस्सीखेच दर्शवतो. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार, मंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी झाले, पैकी शिरसाट आणि सत्तार हे तर या बंडातील म्होरख्यापैकीच होते, अशी देखील चर्चा आहे.

सत्तार वगळता सगळे बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले, पण सत्ता मात्र मुंबईतच ठाण मांडून होते. सत्तार हे किती चिवट आहेत हे त्यांना जवळून ओळखणारे चांगलेच जाणतात. मुंबईत बसून त्यांनी आपल्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील कोट्यावधींची कामे, सिंचन प्रकल्प, रस्ते, आदी मंजूर करून घेतले. शिंदे सत्तार यांच्यावर एवढे मेहरबान का झाले? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. पण बहुदा सत्तार यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार नाही आणि म्हणूनच शिंदे यांनी त्यांना भरघोस निधी देऊन खूष तर केले नाही ना? अशी चर्चा देखील या निमित्ताने होत आहे.(Sambhaji Nagar Latest Marathi News)

आपल्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत इतका निधी कधी मिळाला नव्हता, जेवढा एकनाथ शिंदे यांनी या चार दिवसांत मला दिला, असेही सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विचार केला तर समतोल साधतांना शिंदे यांना बरीच कसरत करावी लागणार हे स्पष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्याला आधीच दोन मंत्री होते. भुमरे कॅबिनेट तर सत्तार राज्य. आता सत्तारांना कॅबिनेट हवे आहे, तर संजय शिरसाट हे देखील मंत्रपदााठी आग्रही आहे. मग इच्छूक तीन आणि जिल्ह्यात मंत्रीपद देणार एक किंवा दोन. तेव्हा कुणाला डच्चू द्यावा हा मोठा प्रश्न शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

Eknath Shinde News, Aurangabad latest Marathi News, Sambhaji Nagar News
मला काढण्याचा कोणालाही अधिकार नाही; हकालपट्टीनंतर संतोष बांगर यांचा खुलासा

सत्तार यांनी घेतलेली सामजस्यांची भूमिका पाहता मंत्रीपदाऐवजी निधी असा शब्द तर त्यांना मिळाला नाही ना? असेही बोलले जाते. पण अत्यंत महत्वाकांक्षी असलेले सत्तार हे आपल्या मनाविरुद्ध घडले तर कधी पलटवार करतील हे सांगता येत नाही, हे शिंदे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना जवळून अनुभवले आहे. त्यामुळे सत्तार यांना दुखावणे शिंदे यांना परवडणार नाही, असेही बोलले जाते. आता सत्तार यांना भरघोस निधी देऊन त्यांच्या वाट्याचे राज्यमंत्रीपद शिरसाटांना आणि भुमेरांना कायम ठेवले जाते? का मग सत्तार निधी आणि मंत्रीपदही मिळवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in